मागील काही काळापासून भारतीय क्रिकेटपटूंचे सोशल मीडिया हँडल हॅक होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये आता भारताचा प्रमुख अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याच्या नावाचा देखील समावेश झाला आहे. नुकतेच त्याचे ट्विटर हँडल हॅक करण्यात आलेले. त्यावरून क्रिप्टो करेन्सीच्या माध्यमातून पैशांची मागणी केली गेलेली.
आयपीएल मध्ये दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याला सनरायझर्स हैदराबाद संघाची अर्ध्यातून साथ सोडावी लागली होती. तो या दुखापतीतून आता सावरत आहे. नुकतेच त्याच्यात ट्विटर हँडलवर असे काही ट्विट आढळले ज्यामध्ये क्रिप्टो करन्सी खरेदी करण्याबाबत बोलले जात होते. त्यावर एका चाहत्याने सुंदरचे ट्विटर हँडल हॅक झाले आहे का असे विचारल्यानंतर ‘नाही’ असे उत्तर आले. त्यावरून अनेकांनी हे हँडल हॅक झाल्याचे म्हटले.
सुंदर हा आपल्या छोट्याशा कारकिर्दीत सातत्याने दुखापतग्रस्त राहिला आहे. भारताच्या 19 वर्षाखालील संघातून पुढे आलेल्या सुंदरने आयपीएलमधील चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले. त्याने आतापर्यंत भारतासाठी चार कसोटी, 16 वनडे व 35 टी20 सामने खेळले आहेत. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या कसोटी मालिका विजयात त्याची निर्णायक भूमिका होती.
मागील काही दिवसांपासून भारतीय खेळाडूंची सोशल मीडिया हँडल हॅक होताना दिसली आहेत. आयपीएल दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे ट्विटर हँडल अशाच प्रकारे हॅक करण्यात आलेले. त्यानंतर भारताचा अष्टपैलू कृणाल पंड्या याचे इंस्टाग्राम हँडल हॅक झालेले. अगदी नवीन सांगायचे झाल्यास युवा वेगवान गोलंदाज यश दयाल याच्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून लव जिहादबाबत वादग्रस्त पोस्ट करण्यात आलेली.
(Cricketer Washington Sundar Twitter Hack Demanding Crypto Currancy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वॉर्नरच्या ताकदीची द्रविडलाही जाणीव; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यापूर्वी म्हणाला, ‘त्याला आऊट करणे…’
भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा स्मिथ WTC फायनलपूर्वी चिंतेत; म्हणाला, ‘होय, मला टेन्शन…’