इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल जगातील सर्वात ग्रॅंड क्रिकेट लीग आहे याबाबत कोणाचे दुमत नसावं. आज एखादा तरुण क्रिकेटर म्हणतही असेल की मला देशाकडून नाही, आयपीएल टीमकडून खेळायचय. आयपीएलमध्ये पैसा मिळतो, प्रसिद्धी मिळते, स्वतःला सिद्ध करायची संधीही मिळते आणि सर्वकाही जुळून आल्यावर आपल्या देशाची जर्सी अंगावर घालायला ही मिळते. अनेक युवा क्रिकेटर्ससोबत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नाव कमावलेले, विविध देशांचे क्रिकेटरही हीच मनिषा बाळगून असतात की, एखाद्या दिवशी आपल्यावरही कोणीतरी बोली लावेल आणि आपण आयपीएल खेळू. बांगलादेशचा मुशफिकूर रहिम १५ वर्ष झालं या आशेवर बसलाय. असो त्याचा विषय पुन्हा कधीतरी. आयपीएलमध्ये कमीत कमी एक मॅच खेळायचं साऱ्यांचं स्वप्न असतं, पण इंटरनॅशनल क्रिकेटमधील असे काही क्रिकेटर होऊन गेले, ज्यांच हे स्वप्न पूर्ण झालं. म्हणजे खरंच त्यांना फक्त एकच आयपीएल मॅच खेळायला भेटली. अशाच क्रिकेटर्सची आज आपण ओळख करून घेऊया, ज्यांच्या नशिबात फक्त एक आयपीएल मॅच लिहिली होती.
आंद्रे नेल
इंडियन क्रिकेटचा बॅड बॉय श्रीसंत त्याच्या बॉलिंग स्पेल आणि नंतरच्या फिक्सिंग कांडसाठी ओळखला जातो, पण त्याने २००६ साऊथ आफ्रिका टूरवर मारलेल्या एका सिक्सचीही बरेचदा चर्चा होते. समोरच्या बॉलरने स्लेजिंग केल्यावर श्रीसंतने सिक्स मारून, त्या बॉलरसमोर डान्स केला. तो बॉलर होता आंद्रे नेल. उजव्या हाताने फास्ट बॉलिंग करणार हा नेल आयपीएलमध्ये फक्त एक मॅच खेळू शकला. आयपीएलच्या पहिल्या सीझनला मुंबई इंडियन्सकडून दिल्ली डेअरडेविल्सविरूद्ध त्यान डेब्यू केला. दुर्दैवाने पहिल्यांदा बॅटिंग करताना तो डायमंड डक झाला. एकही बॉल न खेळता त्याला रन आऊट व्हावं लागलं. बॉलिंगला आल्यावर तीन ओवर टाकत ३१ रन देऊन गौतम गंभीरला आउट करण्यात त्याला यश आलं. मात्र, यानंतर नेल पुन्हा कधीही आयपीएल खेळताना दिसला नाही.
मश्रफे मोर्तजा
बांगलादेशच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात महान फास्ट बॉलर आणि यशस्वी कर्णधार राहिलेला मश्रफे मोर्तजा हे देखील या यादीतील एक नाव. मोर्तजाचे बांगलादेश क्रिकेट आणि वर्ल्ड क्रिकेटसाठी मोठे योगदान असले तरी, आयपीएलमध्ये त्याचे करिअर फक्त एका मॅच पुरते राहिले. २००९ आयपीएलला केकेआरने डेक्कन चार्जर्स विरुद्ध त्याला संधी दिलेली, पण त्या संधीचे त्याला सोने करता आले नाही. आपल्या ४ ओव्हरमध्ये ५८ रन्स त्याने लुटवले. त्या मॅचची लास्ट ओव्हर टाकत असलेल्या मोर्तजाच्या लास्ट बॉलला, रोहित शर्माने सिक्स मारत डेक्कन चार्जर्सला विजयी केले होते. त्या विसरण्यासारख्या मॅचनंतर मोर्तजाला पुन्हा कधीच आयपीएल टीमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नाही.
हेही पाहा- असे दिग्गज क्रिकेटर, जे खेळले केवळ एक आयपीएल सामना
ब्रॅड हॅडिन
मोर्तजाप्रमाणेच केकेआरने ऑस्ट्रेलियन दिग्गज आणि वर्ल्डकप विनिंग विकेटकिपर ब्रॅड हॅडिन यालादेखील आयपीएल डेब्यू करायची संधी दिली होती. २०११ आयपीएलमध्ये हॅडिनने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरूद्ध आपली पहिली आयपीएल मॅच खेळली. ओपनिंगला येत त्याने ताबडतोब १८ रन्स केल्या. ज्यात दोन फोर आणि एक सिक्स सामील होता. त्या मॅचमध्ये केकेआरने आरसीबीला १७२ रन्सचे टारगेट दिले. हे आव्हान क्रिस गेलच्या वादळी शतकापुढे छोटे ठरले. आरसीबीने जिंकलेली ही मॅच हॅडीनसाठी शेवटची ठरली. जवळपास दहा वर्षांनंतर हॅडिन २०२१ मध्ये परत आला. मात्र, यावेळी सनरायझर्स हैदराबादचा फिल्डींग कोच म्हणून.
डॅरेन ब्राव्हो
टी२० चे बेस्ट क्रिकेटर्स म्हणून वेस्ट इंडियन क्रिकेटर्सकडे पाहिले जाते. ते आयपीएलला कॅरेबियन फ्लेवर देतात. आजही वीसेक कॅरेबियन प्लेयर्स आयपीएलमध्ये खेळताना दिसतात. मात्र, यामध्ये डॅरेन ब्राव्हो याचे नाव दिसत नाही. डॅरेन ब्राव्हो हा सीपीएलच्या टॉप रनगेटरपैकी एक आहे. मात्र, आयपीएलमध्ये त्याच्या नशिबात फक्त एकच मॅच लिहिली होती. केकेआरने २०१७ आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरूद्ध त्याला पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळी आयपीएलमध्ये खेळवलं. नॉट आउट चार रनांची इनिंग खेळत, ब्राव्हो आयपीएलमध्ये कायमचा नॉट आउट राहिला.
अकिला धनंजय
सध्या श्रीलंकेच्या स्पिन डिपार्टमेंटचा कणा असलेल्या अकिला धनंजयने २०१२ ला टी२० वर्ल्डकपमधून इंटरनॅशनल डेब्यू केला होता. मात्र, आयपीएलमध्ये खेळण्यासाठी त्याला तब्बल सहा वर्षे वाट पहावी लागली. मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळख मिळवलेल्या धनंजयने २०१८ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी पहिली आयपीएल मॅच खेळला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये तो दिसला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विषये का! पाकिस्तानच्या इंटरनॅशनल क्रिकेटर्सपेक्षा जास्त कमवतात भारतातले रणजी खेळाडू, आकडा तर पाहा