Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशांतर्गत क्रिकेटमध्ये युवा फलंदाजाचं वादळ! वादळी द्विशतक झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

देशांतर्गत क्रिकेटमध्ये युवा फलंदाजाचं वादळ! वादळी द्विशतक झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

March 1, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Yashasvi-Jaiswal

Photo Courtesy: Twitter/BCCIdomestic


भारतीय क्रिकेटला असे काही युवा खेळाडू लाभले आहेत, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडताना दिसत आहेत. त्यात शुबमन गिल आणि पृथ्वी शॉ यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र, काही असेही खेळाडू आहेत, ज्यांना राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाहीये, परंतु ते देशांतर्गत पातळीवर लाजवाब कामगिरी करत आहेत. त्या खेळाडूंमध्ये यशस्वी जयस्वाल याचा समावेश होतो. नुकतेच यशस्वीने त्याच्या फलंदाजीचा दम दाखवून दिला आहे. सध्या इराणी ट्रॉफी खेळली जात आहे. यामध्ये रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध मध्यप्रदेश संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात यशस्वीने द्विशतक, तर त्याच्या जोडीदाराने शतक झळकावले. या द्विशतकानंतर यशस्वीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले आहे.

यशस्वी जयस्वालचे द्विशतक
रेस्ट ऑफ इंडिया (Rest of India) संघाकडून खेळताना यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने शानदार द्विशतकी खेळी साकारली. त्याने यादरम्यान 259 चेंडूंचा सामना करताना 213 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 30 चौकारांचा पाऊस पाडला. या खेळीच्या जोरावर रेस्ट ऑफ इंडियाने मध्यप्रदेश (Madhya Pradesh) संघाविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. जयस्वालला 213 धावसंख्येवर आवेश खान याने बाद केले.

.@ybj_19 roars at the Captain Roop Singh Stadium 💪 💪

A spectacular 2️⃣0️⃣0️⃣ 👏 to help build a solid foundation with Abhimanyu Easwaran

Follow the match 👉 https://t.co/L1ydPUXHQL #IraniCup | #MPvROI | @mastercardindia pic.twitter.com/AIrv9JYEAW

— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 1, 2023

जयस्वालने ठोठावला भारतीय संघाचा दरवाजा, विराट ठरतोय फ्लॉप
विशेष म्हणजे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये यशस्वी खोऱ्याने धावा करतोय. त्याने 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो त्याच्या बॅटमधून विरोधी संघाच्या गोलंदाजांना घाम फोडताना दिसत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने फ्लॉप होताना दिसत आहे. मागील 15 डावात विराटला मोठी धावसंख्या उभारता आली नाहीये. तीनपेक्षा जास्त काळ लोटला, तरीही विराटला कसोटीत शतक झळकावता आले नाहीये. इंदोर कसोटीतही तो अपयशी ठरला.

अशात बीसीसीआय त्याच्या जागी पर्याय शोधण्याचा विचार करण्याची शक्यता आहे. जर गरज पडली, तर यशस्वी भारतीय संघात तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. फक्त यशस्वीच नाही, तर मयंक अगरवालही विराटला कडवी झुंज देत आहे. मयंकने नुकतेच रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावले होते.

आयपीएलमध्ये यशस्वी संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. आता तो 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2023च्या हंगामातही जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

रेस्ट ऑफ इंडियाच्या 381 धावा
यशस्वी जयस्वालच्या 213 धावा आणि अभिमन्यू ईश्वरन याच्या 154 धावांच्या जोरावर रेस्ट ऑफ इंडिया संघाने 381 धावांचा डोंगर उभा केला आहे. अशात आशा केली जात आहे की, दुसऱ्या दिवशीही संघ चांगली फलंदाजी करेल. त्यामुळे संघाचे लक्ष मोठी धावसंख्या उभारण्यावर असेल. तसेच, मध्यप्रदेश संघाच्या गोलंदाजांना फक्त 3 विकेट्स घेण्यात यश आले आहे. यातील दोन विकेट्स आवेश खान याच्या नावावर आहेत. तसेच, एक फलंदाज धावबाद झाला होता. (cricketer yashasvi jaiswal hit a stormy double century madhya pradesh vs rest of india irani trophy)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची धुरा ‘या’ दिग्गजाच्या हाती, आता रोहितप्रमाणे तीही लावणार विजेतेपदांची रांग
मोठी प्रतिष्ठा घेऊन आलेला ऑसी फलंदाज ठरला जड्डूसमोर खोटा! आत्तापर्यंत इतक्या वेळा दाखवला तंबूचा रस्ता


Next Post
Umesh-Yadav

थेट 'सिक्सर किंग' युवीला पछाडत उमेश 'स्पेशल' यादीत! रवी शास्त्रींचा पराक्रमही ध्वस्त

Shardul-Thakur

व्हिडिओ: लग्नाच्या बेडीत अडकलेल्या शार्दुलचा पत्नीसाठी झक्कास उखाणा; म्हणाला, 'बॉलिंग करतो क्वीक...'

Photo Courtesy: Twitter/ICC

अखेर पाकिस्तानच्या कर्णधाराने दिला राजीनामा! विश्वचषकातील खराब कामगिरीची घेतली जबाबदारी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143