---Advertisement---

जयस्वालचा षटकार थेट स्टेडिअमच्या बाहेर, गोलंदाजही पाहतच राहिला; पठ्ठ्याने स्वत:च शेअर केला व्हिडिओ

On: गुरूवार, ऑक्टोबर 13, 2022 4:01 PM
Yashasvi-Jaiswal
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल तुफान फॉर्ममध्ये आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमधील टी20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो आपल्या बॅटमधून कमाल करत आहे. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबई संघाने या स्पर्धेच्या अ गटातील लीग सामन्यात सध्याच्या रणजी विजेत्या मध्यप्रदेश संघाला 8 विकेट्सने पराभूत केले. 20 वर्षीय फलंदाजाने यादरम्यान अर्धशतक  भिरकावत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने मारलेला हा फटका एवढा जबरदस्त होता की, चेंडू थेट स्टेडिअमच्या बाहेर गेला. याचा व्हिडिओ खुद्द जयस्वालने शेअर केला आहे.

डावखुऱ्या हाताचा फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो मध्यप्रदेश संघाचा पार्ट टाईम गोलंदाज शुभम शर्मा याचा चेंडू स्टेडिअमच्या बाहेर पाठवताना दिसत आहे. मुंबई संघाच्या डावाच्या 15व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जयस्वालने पुढे येत पूर्ण ताकदीने चेंडू भिरकावला. चेंडू इतक्या उंचीवर गेला की, तो थेट स्टेडिअमच्या बाहेर जाऊन पडला. त्याचा हा गगनचुंबी षटकार स्वत: गोलंदाजही पाहत राहिला.

https://twitter.com/ybj_19/status/1580451904064143360?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1580451904064143360%7Ctwgr%5E6e1472ef917e58f6d43ecbe41d31faae4fbc7c44%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-watch-video-yashasvi-jaiswal-hits-six-over-the-stadium-roof-against-madhya-pradesh-in-syed-mushataq-ali-trophy-4738991.html

रजत पाटीदारची अर्धशतकी खेळी
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर मध्यप्रदेश संघाने या सामन्यात 7 विकेट्स गमावत 181 धावांचा डोंगर उभा केला होता. यावेळी त्यांच्याकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा स्टार क्रिकेटपटू रजत पाटीदार (Rajat Patidar) याने 67 धावा (35 चेंडूत 5 षटकार) आणि राष्ट्रीय संघात पुनरागमनाच्या प्रतीक्षेत असलेल्या वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याने 57 धावा (35 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकार) चोपल्या. मात्र, मुंबई संघाने हे आव्हान अवघ्या 17 षटकात पार केले. त्यांच्याकडून पृथ्वी शॉ याने 12 चेंडूत 5 चौकार मारत 29 धावा चोपल्या.

मुंबई संघाचा सलग दुसरा विजय
पुढे यशस्वी जयस्वाल याने 44 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 66 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईने 8 विकेट्सने जिंकला. सरफराज खान (30 धावा) आणि अमन हकीम खान (21) यांनी मोलाचे योगदान दिले. विशेष म्हणजे, मुंबई संघाने खेळलेल्या 2 सामन्यातील हा सलग दुसरा विजय आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबई संघ 8 गुणांसह अ गटात अव्वलस्थानी आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
थायलंडला धूळ चारून आशिया चषक उंचावण्यासाठी हरमनप्रीत तयार; म्हणाली, ‘आम्ही तयार, समोर कुणीही असो…’
वॉर्नरची कर्णधारपदाची वाट मोकळी, स्वतः क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे डायरेक्टर करत आहेत विचार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---