इंडियन प्रीमिअर लीग 2023मध्ये देशभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये काही अनुभवी आहे, तर काही युवा खेळाडूंचाही समावेश आहे. यामध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंमध्ये युवा फलंदाज यशस्वी जयसवाल याचाही समावेश आहे. सलामीला फलंदाजी करत जयसवाल गोलंदाजांविरुद्ध धावांचा अक्षरश: पाऊस पाडत आहे. गुरुवारी (दि. 27 एप्रिल) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळताना जयसवाल पुन्हा एकदा चमकला. त्याने यावेळी अवघ्या 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तसेच, एकूण 43 चेंडूत 77 धावांची तडाखेबंद खेळी साकारली. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 8 चौकारांचाही पाऊस पाडला. मात्र, त्याच्या या 4 षटकारांपैकी एक षटकाराची चांगलीच चर्चा रंगली आहे.
झाले असे की, युवा फलंदाज यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाकडून डावाची सुरुवात केली होती. राजस्थानच्या डावातील सातवे षटक चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) टाकत होता. या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर फक्त दोन धावा निघाल्या होत्या. मात्र, जडेजाच्या षटकातील चौथ्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारत थर्ड मॅनच्या दिशेने खणखणीत षटकार (Yashasvi Jaiswal Six) खेचला. त्याच्या या षटकारामुळे चेन्नई संघाच्या चीअरलीडर्सही धावताना दिसल्या. यादरम्यानचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. तसेच, जयसवालच्या या शॉटची सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच, काहीजण केएल राहुलपेक्षा यशस्वी चांगला फलंदाज असल्याचेही म्हणत आहेत.
https://twitter.com/IPL/status/1651598724026748930?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1651598724026748930%7Ctwgr%5Ec66f12783fe0830d4f1bdc262b4156d5a6c09cf8%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Fwatch-video-yashasvi-jaiswal-reverse-hit-six-in-ravindra-jadeja-over-social-media-reacts-1086132
सोशल मीडियावर कौतुक
भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण याने ट्वीट करत म्हटले की, “इथे यशस्वी जयसवालबद्दल आवडणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्याची फटके मारण्याची क्षमता ही उच्च दर्जाची आहे.”
https://twitter.com/IrfanPathan/status/1651606164348747776?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1651606164348747776%7Ctwgr%5Ec66f12783fe0830d4f1bdc262b4156d5a6c09cf8%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Fwatch-video-yashasvi-jaiswal-reverse-hit-six-in-ravindra-jadeja-over-social-media-reacts-1086132
एका युजरने केएल राहुलशी तुलना करणारे ट्वीट करत लिहिले की, “यशस्वी जयसवालचे व्हर्जन हे केएल राहुलच्या कोणत्याही व्हर्जनपेक्षा भारी आहे.”
https://twitter.com/76thHundredWhxn/status/1651598877903175680?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1651598877903175680%7Ctwgr%5Ec66f12783fe0830d4f1bdc262b4156d5a6c09cf8%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Fwatch-video-yashasvi-jaiswal-reverse-hit-six-in-ravindra-jadeja-over-social-media-reacts-1086132
दुसऱ्या एकाने ट्वीट केले की, “यशस्वी जयसवाल हा शानदार शॉट्स मारत अप्रतिम खेळी करत आहे. तो आयपीएलमधील सर्वात तंत्रशुद्ध फटके मारणारा युवा फलंदाज वाटत आहे.”
https://twitter.com/SPORTYVISHAL/status/1651601073747132422?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1651601073747132422%7Ctwgr%5Ec66f12783fe0830d4f1bdc262b4156d5a6c09cf8%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Fwatch-video-yashasvi-jaiswal-reverse-hit-six-in-ravindra-jadeja-over-social-media-reacts-1086132
याव्यतिरिक्त काही दिग्गज क्रिकेटपटू आणि चाहतेही अनेक प्रतिक्रिया देत आहेत.
Yashasvi Jaiswal at 21 is a generational talent, a genuine all format player.
Team India have a gem awaiting. #RRvCSK— Tom Moody (@TomMoodyCricket) April 27, 2023
Some glorious hitting by Yashasvi Jaiswal tonight, he scored 77 runs off just 43 balls. pic.twitter.com/C0zhFDrN2h
— Cricket is Love ❤ (@cricketfan__) April 27, 2023
यशस्वी जयसवालची आयपीएल 2023मधील कामगिरी
यशस्वी जयसवाल याने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 38च्या सरासरीने आणि 147.57च्या स्ट्राईक रेटने 304 धावा चोपल्या आहेत. 21 वर्षीय जयसवाल हा हंगामात सर्वाधिक धावा राजस्थानचा अव्वल, तर एकूण सहावा फलंदाज आहे. (cricketer yashasvi jaiswal reverse hit six in ravindra jadeja over see viral video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जयसवालला ‘यशस्वी’ होण्यापासून रोखण्यात ‘धोनी रिव्ह्यू सिस्टम’ही फेल, ‘इतक्या’ चेंडूत ठोकली फिफ्टी
‘रॉयल नाम सुनकर आरसीबी समझे क्या? RCB नहीं…’, चेन्नईच्या पराभवानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस