---Advertisement---

युवराज म्हणतो, माझ्याबद्दल आलेले ते वृत्त चूकीचे…

---Advertisement---

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आणि 2011च्या विश्वचषक विजयाचा स्टार फलंदाज युवराज सिंग (Yuvraj Singh) त्याची पत्नी हेजल कीचसह वेबसीरिजमध्ये काम करणार असल्याची चर्चा सध्या सुरु होती. परंतू युवराजनेच आता ही अफवा असल्याचे म्हटले आहे.

यापूर्वी असे वृत्त आले होते की युवराजने त्याची पत्नी हेजल कीच आणि त्याचा छोटा भाऊ जोरावर सिंगसोबत एक वेब सीरिज साइन केली आहे. यात जोरावर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच युवराजची आई शबनम सिंगदेखील लवकरच या प्रोजेक्टशी जोडल्या जातील. ही वेबसीरिज आसामचा एक प्रॉडक्शन हाऊस ‘ड्रीम हाऊस प्रोजक्शन्स’ बनवणार आहे.

पण ही बातमी पूर्णपणे बरोबर नसल्याचे युवराजने ट्विट करत सांगितले आहे. युवराजने ट्विट केले आहे की ‘मी वेबसिरिजमध्ये पदार्पण करणार असल्याच्या वृत्ताद्दल काही सुधारित गोष्टी सांगायच्या आहेत. हे वृत्त चूकीचे आहे. या वेबसिरिजमध्ये माझा लहान भाऊ काम करणार आहे, मी नाही. मी मीडियामधील माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की याबद्दल सत्य पडताळून पहा.’

युवराजने मागीलवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच बीसीसीआच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे तो विविध देशांच्या लीगमध्ये खेळताना दिसतो. नुकताच तो ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या आगीत नुकसान झालेल्यांसाठी खेळण्यात आलेल्या चॅरिटी सामन्यात गिलख्रिस्ट एकादश संघाकडून पाँटिंग एकादश संघाविरुद्ध खेळला.

तसेच तो आता मार्चमध्ये होणाऱ्या अनअकॅडेमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, झहिर खान यांच्यासह भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---