‘बायकोला कुठं सोडू?’, बसमध्ये चल म्हणणाऱ्या नेहराला चहलचे प्रत्युत्तर; एकदा पाहाच

'बायकोला कुठं सोडू?', बसमध्ये चल म्हणणाऱ्या नेहराला चहलचे प्रत्युत्तर; एकदा पाहाच

गुजरात टायटन्स संघाने आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी आयपीएल २०२२मध्ये पहिल्यांदा प्लेऑफ फेरी गाठत पुढे अंतिम सामन्यातही धडक मारली. तसेच, अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला चारी मुंड्या चीत करत पहिला वहिला आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आणि गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा याचे चांगलेच कौतुक केले जात आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली कागदावर मजबूत दिसणाऱ्या गुजरात संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकली. आता तो वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.

भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्यासोबतचा आशिष नेहरा (Ashish Nehra) याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. चहल आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा भाग होता. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात असताना नेहरासोबत काम केले आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चहल आणि नेहरा एकत्र दिसत आहेत. नेहरा चहलला त्याच्यासोबत बसमध्ये येण्यास सांगत आहे. मात्र, चहल हे ऐकण्यास नकार देत आहे. तो म्हणतो की, त्याला त्याची पत्नी धनश्री वर्मासोबत कारमध्ये जायचे आहे.

इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले आहेत. धनश्री कारमध्ये बसल्यानंतर चहलही तिच्यासोबत चालू लागतो. जसे चहल तिच्या कारच्या जवळ जातो, तसा नेहराचा आवाज येतो. तो चहलला म्हणतो की, “अरे तू इथे बसमध्ये ये.”

https://www.instagram.com/reel/CeVVgjCFmhM/?utm_source=ig_embed&ig_rid=6bba8a4d-e2ce-4ab6-9592-3f3c3e713217

यावर चहल म्हणतो की, “मला बसमध्ये यायचे नाही.” नेहरा जेव्हा यामागील कारण विचारतो, तेव्हा तो म्हणतो की, “मग मी माझ्या बायकोला कुठे सोडू?” यावर नेहरा म्हणतो की, “बायकोही आपल्यासोबत बसमध्ये येईल.” हा व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

काही चाहत्यांनी कमेंट करत त्यांना व्यसनीही म्हटले आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “सगळेच्या सगळे टुल आहेत.”

दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “भावाला बीअर जरा जास्तच चढली.”

चहलने आयपीएल २०२२मध्ये (IPL 2022) सर्वांच्या भुवया उंचावतील अशीच दमदार कामगिरी केली. त्याने या हंगामात १७ सामन्यात गोलंदाजी करताना १९.५१च्या सरासरीने आणि ७.७५च्या इकॉनॉमी रेटने सर्वाधिक २७ विकेट्स घेतल्या होत्या. यासह त्याने पर्पल कॅपही आपल्या नावावर केली. अंतिम सामन्यात चहलच्या संघाची टक्कर गुजरात टायटन्सविरुद्ध झाली होती. यामध्ये गुजरातने राजस्थानला ७ विकेट्सने धूळ चारली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! धनश्री नाहीये चहलचं पहिलं प्रेम, खुद्द तिनेच केलाय खुलासा

ठरलं तर! एका वर्षात १०० टक्के होणार २ आयपीएल; असं आम्ही नाही, तर ‘हा’ दिग्गज म्हणतोय

आयपीएलचे हिरो, रणजीत झिरो! क्वार्टर फायनलमध्ये गिल-मयंकसह सपशेल फ्लॉप ठरले ‘हे’ क्रिकेटर

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.