भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी गुरुवारी (दि. 30 नोव्हेंबर) अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. वनडे संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 15 सदस्यीय संघातील 12 खेळाडूंना जागा मिळाली नाहीये. तसेच, दीर्घ काळ संघातून बाहेर असलेल्या युझवेंद्र चहलचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे.
दीर्घ काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्यासाठी गुरुवारचा दिवस आनंदाचा ठरला. चहलला डिसेंबर महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघात निवडले गेले आहे. मात्र, चहलला टी20 संघात सामील केले गेले नाहीये. अशात चहलने वनडे संघातील पुनरागमनाविषयी भावूक (Yuzvendra Chahal Emotional) होत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
युझवेंद्र चहल सोशल मीडिया पोस्ट
चहलने एक्स हँडलवर फक्त 4 शब्दांची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये चहलने आपला फोटोही शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हिअर वी गो अगेन.” म्हणजेच चला आपण पुन्हा जाऊयात. चहलविषयी बोलायचं झालं, तर तो भारतीय संघाकडून ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळताना दिसला होता. विशेष म्हणजे, आशिया चषक 2023 आणि विश्वचषक 2023 या दोन मोठ्या स्पर्धांसाठी त्याची निवड झाली नव्हती.
Here we go AGAIN! 🇮🇳💙 pic.twitter.com/x4l3Yk91Ee
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) November 30, 2023
न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता अखेरचा वनडे सामना
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडलेल्या वनडे संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार आहे. संघात एकूण 4 फिरकीपटूंचा समावेश आहे. कुलदीप यादव आणि चहलव्यतिरिक्त अष्टपैलू अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही स्थान मिळाले आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवात 17 ते 21 डिसेंबरदरम्यान खेळली जाईल. चहलने भारतासाठी अखेरचा वनडे सामना जानेवारी 2023मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चाहर. (cricketer yuzvendra chahal comeback indian odi team for south africa tour reaction goes viral)
हेही वाचा-
अर्रर्र! बलाढ्य संघाच्या ‘या’ खेळाडूची इंटरनॅशनल क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती, नुकतीच झालेली वनडे संघात निवड
INDvsAUS 4th T20: टीम इंडिया मारणार का रायपूरचं मैदान? वाचा खेळपट्टी ते हवामानापर्यंत सर्व माहिती