---Advertisement---

विम्बल्डन: क्रिकेटपटूंनी दिल्या फेडररला विजयानंतर शुभेच्छा!

---Advertisement---

रॉजर फेडररने काल विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात मारिन चिलीचला पराभूत करून आठवे विम्बल्डन विजेतेपद आपल्या नावे केले. फेडररने आपल्या कारकिर्दीतआतापर्यंत १९ वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे. त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्याकडे फेडररपेक्षा ४ ग्रँड स्लॅम कमी आहेत.

सामन्यातील पहिल्याच सेट नंतर मारिनला दुखापत झाली आणि यामुळे तो त्याच्या क्षमतेनुसार खेळ करू शकला नाही. फेडररने कोणतीही दया न दाखवता सुरेख खेळ करून सामना आणि विजेतेपद आपल्या नावावर केले. फेडररने आतापर्यंतच्या जिंकलेल्या ८ विम्बल्डन चषकामधे असे पहिल्यांदाच झाले आहे की त्याने एकही सेट न गमावता सामना जिंकला. या विजयानंतर त्याने एटीपी क्रमवारीत तिसरा क्रमांक मिळवला आहे.

आपण खूप वेळा पाहिलं आहे की क्रिकेटपटू ही टेनिसच्या सामन्याला हजेरी लावता. सचिन तेंडुलकर आणि विराटने तर विम्बल्डनला अनेक वेळा हजेरी लावली आहे.

आता २०१७च्या विम्बल्डन विजेत्या रॉजर फेडररला ही काही क्रिकेटपटूंनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. पाहुयात कोण आहेत ते क्रिकेटपटू.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment