इंडियन प्रीमियर लीग (IPL) ऑक्शन इतिहासात जे आत्तापर्यंत असे घडले नाही ते आयपीएल 2024च्या लिलावात घडले. मागच्या वर्षी 19 डिसेंबर रोजी हा लिलाव पार पडला. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याच्यायवर कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल 24.75 कोटी रुपये खर्च. तर पॅट कमिन्स (Pat Cummins) याला 20.50 कोटी रुपयांमध्ये सनराईज हैदराबाद फ्रँचायझीने घेतले. या खेळाडूंवर ज्या प्रमाणात पैसा खर्च केला गेला, त्यावर दक्षिण अफ्रिकीचा माजी अष्टपैलू क्रिस मॉरिस याने वक्तव्य केले. मॉरिस देखील एकेकाळी आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
ऑस्ट्रेलिया संघाचा महत्वाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क अनेक वर्षापासून आईपीएलमधून बाहेर राहिला होता. पण 2024 साठी त्याने आपले नाव आईपीएलमध्ये नोंदवले. लिलावात त्याला घेण्यासाठी अनेक फ्रेंचाइजी कोणत्याही स्तराला जाऊ शकत होती आणि अगदी तसेचं झाले आहे. कोलकत्ता नाईट राइडर्सने स्टार्कला 24.75 कोटी रुपयांमध्ये खरेदी करून. आणि अनुभवी वेगवान गोलंदाजाला आपल्या ताफ्यात सामील केले. स्टार्क आयपीएल इतिहासातील आजपर्यंतचा सर्वात महाग खेळाडू ठरला. दरम्यान पॅट कमिन्सला हैदराबादने 20.50 कोटीला आपल्या संघात घेतले.
क्रिस मॉरिस हे मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स बोलताना
माध्यमांशी बोलताना क्रिस मॉरिस म्हणाला, “आईपीएल लिलावात या खेळाडूंना अधिक पैसे मिळाले त्याबद्दल मी आनंदी आहे. पण यासोबतचं त्यांच्यावर चांगल्या प्रदर्शन करण्याचा दबाव असणार आहे. क्रिकेटची तुलना जर इतर खेळांसोबत होत असेल तर ही चांगली बाब आहे. कारण यात जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंना अधिक पैसे देण्यात आले आहे. ही एक जबरदस्त उपलब्धी आहे. परंतु त्यांच्यावर दबाव पण येऊ शकतो. स्टार्क आणि कमिन्स हा दबाव चांगल्या पद्धतीने पेलू शकतात यामुळेच यांना इतके पैसे देऊन खरेदी केली गेले आहे.”
मिचेल स्टार्कने आईपीएल जास्त सामने खेळले नाहीत. त्याचा नावावर 27 सामन्यांमध्ये 34 विकेट्स आहेत. तर पॅट कमिन्सने 42 सामन्यांमध्ये 45 विकेट्स घेतल्या आहे. आयपीएल इतिहासातील या दोन सर्वात महागड्या खेळाडूंचे प्रदर्शन आगामी हंगामात कसे राहणार, हे पाहण्यासारखे असेल.
महत्त्वाच्या बातम्या
विराट आणि जोकोविच मेसेजवर बोलतात! महान टेनिसपटूने सांगितले विराटसोबत कसे आहेत संबंध?
Bhuvneshwar Kumar । 8 विकेट्स घेत गाजवलं ग्रीन पार्क, भुवनेश्वरने पुन्हा ठोठावले टीम इंडियाचे दरवाजे