अफगानिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये चांगलाच चर्चेत राहिला. विराट कोहली याच्यासोबत त्याने घातलेला वाद आणि त्याचे एकंदरीत प्रदर्शन चाहत्यांसाठी मनोरंजनाचा विषय ठरला. केएल राहुल कर्णधार असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचे प्रतिनिधित्व त्याने मागच्या हंगामात केले. आयपीएल 2024 मध्ये नवीन राहुलच्याच नेतृत्वात खेळणार असून त्याने कर्णधाराच्या नेतृत्वगुणांबाबत खास प्रतिक्रिया दिली.
केएल राहुल खुप चांगला माणूस – नवीन उल हक
एका वृत्तसंस्थेशी मुलाखती दरम्यान बोलताना नवीनने केएल राहुल विषयी आपल मत व्यक्त केले. तो म्हणाला, “केएल राहुल एक चांगला कर्णधार आहे. मी मागील हंगामात त्याच्या नेतृत्वात खेळलो होतो. तो पुढे येऊन नेतृत्व करणारा कर्णधार आहे. मी पुन्हा एकदा त्याच्या नेतृत्वात खेळण्यासाठी उत्सुक आहे. त्याच्या नेतृत्वात माझं प्रदर्शनही चांगलं होत. राहुल एक माणूस म्हणूनही खूप चांगला आहे. त्याची काम करण्याची पद्धत सुद्धा जबरदस्त आहे. मी लखनऊ सुपर जायंटचा हिस्सा बनून खूप खुश आहे, ज्याचा कर्णधार राहुल आहे.”
विराट सोबतच्या वादामुळे मागच्या हंगामात नवीन उल हक चर्चेचा विषय ठरलेला
मागील हंगामात लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील एका सामन्यावेळी नवीन आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी माध्यमांमध्ये या गोष्टीची खूप चर्चा झाली होती. सोशल मिडीयावरही हे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. वादात भर म्हणजे गौतम गंभीर याने नवीनची बाजू घेत विराटलाच आपल्या अंगावर घेतले होते. त्यावेळी कर्णधार केएल राहुलने हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. गंभीर आणि विराटचा वाद मागच्या वर्षभरात चर्चेचा विषय ठरला, पण अनेकदा गंभीरकडून विराटचे कौतुकही ऐकायला मिळाले. गंभीरच्या म्हणण्यानुसार विराटसोबतचा वाद केवळ मैदानात होता. (naveen ul haq on kl rahul s ability as skipper)
महत्वाच्या बातम्या
Ranji Trophy : पाच वर्षांनंतर रेड बॉल क्रिकेटमध्ये भुवनेश्वरचे दमदार पुनरागमन, लावली विकेट्सची रांग
PAK vs NZ 1st t20i । न्यूझीलंडकडून पाकिस्तानचा दारून पराभव, डॅरिल मिचेल आणि साऊदी ठरले मॅच विनर