आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा एमएस धोनी खेळेल का, याबद्दल क्रिकेट जगताला अनेक प्रश्न पडले आहेत. त्याला अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केले जाईल का? हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याबाबत क्रिकबझने एका अहवालात धोनीच्या आगामी सिजनमध्ये खेळण्याबद्दलची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनीही धोनीच्या खेळाबाबत अनिश्चित विधान केले होते.
महेंद्रसिंग धोनी पुढील हंगामात खेळणार का? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पण सीएसकेचे अधिकारी लवकरच धोनीची भेट घेणार आहेत. धोनी आणि सीएसके अधिकाऱ्यांमध्ये ऑक्टोबरच्या मध्यात मुंबईत बैठक होणार आहे. ज्या बैठकीत धोनी आपला अंतिम निर्णय घेऊ शकतो.
मागील मोसमात, एमएस धोनीने 14 सामन्यात 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 161 धावा केल्या होत्या. तसेच त्याने भरपूर षटकार मारले. त्यामुळे यावेळीही त्याला खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
बीसीसीआयने नुकतीच आयपीएल संघ मालकांसोबत बैठक घेतली आणि अनकॅप्ड खेळाडूंच्या नियमाची घोषणा केली. या नियमांतर्गत, 4 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूला अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केले जाईल. हा नियम लागू झाल्याने धोनीच्या आयपीएल 2025 मध्ये खेळण्याच्या आशा वाढल्या आहेत. जर धोनी अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झाला. तर त्याचे वेतन 12 कोटींवरून 4 कोटी रुपये होईल.
हेही वाचा :
AUSW vs SLW: कांगारूंची वरचढ, आशियाई चॅम्पियन श्रीलंकेचा दारुण पराभव
IND vs BAN; पहिल्या टी20 सामन्यासाठी कशी असणार भारताची प्लेइंग 11?
विकेटही घेतल्या, शतकही ठोकलं! टीम इंडियाला मिळाला नवा अश्विन?