---Advertisement---

दोन वर्षाच्या तुरूंगवासापासून वाचण्यासाठी रोनाल्डोला भरावे लागणार तब्बल १५० कोटी

On: शनिवार, जुलै 28, 2018 4:01 PM
---Advertisement---

पोर्तुगल आणि जुवेंट्सचा फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोला कर बुडविल्या प्रकरणी दोन वर्षाच्या तुरूंगवासापासून वाचण्यासाठी सुमारे 18.8 मिलीयन युरो दंड भरावा लागणार आहे.

कर चुकवल्या प्रकरणी रोनाल्डोने दंडाची रक्कम भरण्याचे मान्य केले आहे. यामुळे त्याच्या पाठीमागचे स्पॅनिश अधिकाऱ्यांचे सत्र अखेर संपले आहे.

स्पॅनिश सरकारने त्याला कर बुडविल्या प्रकरणी 18.8 मिलीयन युरो रक्कम भरण्यास सांगितली आहे. जर त्याने ही रक्कम भरली तर त्याला ठोठावलेली दोन वर्षाची जेल रद्द करण्यात येईल.

झाले असे की, मागच्या वर्षी त्याच्यावर 14.7 मिलीयन युरोचा कर न भरल्याचा आरोप होता. पण हा आरोप त्याच्या एजंटमार्फत त्याने फेटाळला होता.

2011 आणि 2014 यादरम्यान हे कर रोनाल्डोने आणि त्याच्या एजंटांनी चुकवले असल्याचे लक्षात आले. त्याने केलेले हे चार आर्थिक गुन्हे स्विकारले आहेत.

जुलै महिन्यात स्पॅनिश कोर्टमध्ये 90 मिनिटे चाललेल्या सुनावणीत रोनाल्डोने एवढा कर बुडविल्याचे मान्य केले नाही. मग स्पॅनिश अधिकाऱ्यांनी त्याला 5.7 मिलीयन युरो हे त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी तर उरलेले 13.1 मिलीयन युरो दंड म्हणून मागितले आहेत.

फोर्ब्सनुसार, रोनाल्डो वर्षाला 93 मिलीयन डॉलर(80 मिलीयन युरो) कमवतो. तसेच त्याने आताच जुवेंट्ससोबत 846 कोटी रुपयांचा करार केला आहे.

स्पॅनिश सरकारने ज्या फुटबॉलपटूंनी कर बुडवला आहे त्यांना भरण्यास सांगितले आहे. तसेच ‘बेकहॅम कायद्या’नुसार त्यांची रक्कम कमी करण्यात आली आहे.

तसेच बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी पण 2017ला कर चुकवण्यामध्ये आढळून आला होता. यामुळे त्याला 21 महिन्यांची तुरुंगवास सुनावण्यात आली होती. त्याने सांगितलेला दंड भरल्याने त्याचीही शिक्षा रद्द करण्यात आली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

–मार्टिन गप्टीलने केला टी२० मधील मोठा कारनामा

–मोठी चूक समजल्यावर बार्सिलोनाच्या अधिकाऱ्यांना झाला पश्चाताप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment