पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने काही दिवसांपूर्वीच जुवेंट्स फुटबॉल क्लबसोबत चार वर्षांसाठी 846 कोटी रुपयांचा करार केला आहे.
जुवेंट्सने घेतलेल्या खेळाडूंच्या फिटनेस चाचणीत त्याने कमाल केली आहे. रोनाल्डोची शारिरीक क्षमता 20 वर्षे वयाच्या तरूण फुटबॉलपटूंसारखी आहे असे त्याच्या रिपोर्टमध्ये समोर आले आहे.
या 33 वर्षीय खेळाडूच्या शरीरातील फॅट 7% असून बाकीच्या व्यावसायिक खेळाडूंपेक्षा 3%ने कमी आहे. तर त्याच्या स्नायुंचे वस्तुमान बाकीच्या व्यावसायिक खेळाडूंपेक्षा 4% ने जास्त असे 50% आहे.
📹 Stepping into #CR7DAY like 😁 #CR7JUVE @Cristiano pic.twitter.com/7WzAz4lwDd
— JuventusFC 🇬🇧🇺🇸 (@juventusfcen) July 16, 2018
जुवेंटसने त्याला 100 मिलीयन युरो ट्रान्सफर फी दिली आहे. याआधी तो रियल माद्रिद बरोबर नऊ वर्षे खेळला आहे.
नुकत्याच झालेल्या फिफा विश्वचषकातील खेळांडूमध्ये रोनाल्डो हा बाकीच्या खेळाडूंपेक्षा जास्त धावला आहे. तो तब्बल 33.98 किलोमीटर या स्पर्धेत धावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–मेसट ओझीलचे आरोप जर्मनी फुटबॉल महासंघाने फेटाळले
–क्रोएशियन फुटबॉल संघाच्या या कृत्याने जिंकली जगभरातील चाहत्यांची मने