---Advertisement---

गर्लफ्रेंडच्या वाढदिवशी रोनाल्डो भाऊंचं हटके सेलिब्रेशन; ‘इतके’ कोटी खर्च करत थेट बुर्ज खलिफावरच लेझर शो

On: शनिवार, जानेवारी 29, 2022 5:38 PM
Cristiano-Ronaldo
---Advertisement---

प्रेमासाठी लोक अनेक भन्नाट गोष्टी करतात, असं अनेकदा सर्वांनी ऐकलं आणि पाहिलं देखील आहे. आता असाच काहीसा प्रकार स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या बाबतीत घडताना पाहायला मिळाला आहे. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस दणक्यात साजरा केलेला दिसून आला. या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. 

रोनाल्डो हा जगातील श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. याचाच प्रत्यय रोनाल्डोने त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिग्जचा वाढदिवस साजरा करताना आला आहे. शुक्रवारी जॉर्जिनाचा २८ वा वाढदिवस होता.

https://www.instagram.com/p/CZPZuv4Bx9M/

तिच्या वाढदिवसानिमित्त रोनाल्डोने तब्बल ५०,००० पाउंड्स खर्च केला आहे. पोर्तुगाल आणि मँचेस्टर युनायडेट संघाचा स्टार स्ट्रायकर असलेल्या रोनाल्डोने दुबई येथे असलेली जगातील सर्वात मोठी बिल्डिंग बुर्ज खलिफावर वैयक्तिक लेझर शो जॉर्जिनासाठी सरप्राईज म्हणून भेट दिला. त्यामुळे जॉर्जिनाच्या वाढदिवसानिमित्त बुर्ज खलिफावर तिचा चेहरा झळकत होता. या शोचा व्हिडिओ रोनाल्डो तसेच जॉर्जिनानेही सोशल मीडियावर शेअर केला आहे. जॉर्जिना ही पेशाने मॉडेल आहे.

https://www.instagram.com/p/CZP0SU_BXEm/

https://www.instagram.com/p/CZROBqlP8h7/

 

मिरर डॉट को युकेच्या रिपोर्टनुसार, ‘हा आयकॉनिक टॉवर (बुर्ज खलिफा) रात्रीच्या वेळी जगातील सर्वात मोठी डिस्प्ले स्क्रीन बनतो, अलीकडील अहवालांमध्ये टॉवरच्या दर्शनी भागावर तीन मिनिटांची जाहिरात किंवा संदेश प्रदर्शित करण्याची किंमत किमान 50,000 पाउंड्स आहे. ही किंमत आठवडा अखेरीस (विकेंड) वाढते.’

गेल्या अनेक वर्षांपासून रोनाल्डो आणि जॉर्जिना रिलेशनशिपमध्ये आहेत. जॉर्जिना सध्या प्रेग्नंट असून लवकरच ती आई होणार आहे. रोनाल्डोला याआधी २ मुले आणि २ मुली आहेत. त्याचा मोठा मुलगा १२ वर्षांचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे वार्षिक पुरस्कार जाहीर! स्टार्क-हेडचा ‘डबल धमाका’; पाहा संपूर्ण यादी

भारतीय महिलांचे पुन्हा ‘चकदे’! आशिया चषकात पटकावले कांस्यपदक

फलंदाजांचा घाम काढण्यासाठी श्रीलंकेत तयार होतोय ‘मिनी मलिंगा’, गोलंदाजी शैलीने आयसीसीलाही पाडलीय भुरळ

व्हिडिओ पाहा –  द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण

द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण | Bet between Dravid and Prasad

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---