---Advertisement---

Video: जेव्हा सामना संपण्यापूर्वीच रागाच्या भरात रोनाल्डोने सोडले होते मैदान; आर्मबँडही दिला होता फेकून

On: मंगळवार, मार्च 30, 2021 12:01 AM
---Advertisement---

पोर्तुगाल आणि सर्बिया यांच्यात 2 मार्च रोजी खेळल्या गेलेल्या फिफा वर्ल्ड कपच्या पात्रता सामन्यात क्रिस्टियानो रोनाल्डो चिडला होता. त्याने रागाने आपला कर्णधारपदाचा आर्मबँडही फेकला होता. इतकेच नाही तर सामन्याच्या निर्धारित वेळेपूर्वीच त्याने मैदान सोडले होते. रोनाल्डोचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच हा क्वालिफायर सामना 2-2 ने बरोबरी संपला होता.

या रोमांचक सामन्यात शेवटच्या क्षणी तो आपल्या संघाला विजय मिळवून देईल असा त्याने विचार केला होता. परंतु. त्याने केलेल्या स्ट्राइकने गोलची रेषा ओलांडली नाही. पण रिप्लेमध्ये चेंडूने रेषा ओलांडली आहे, असे दिसत होते. याचा अर्थ पोर्तुगालला जाणीवपूर्वक विजयापासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे रोनाल्डो भडकला होता.

सामन्याचा शेवटचा मिनिट संपण्यापूर्वी पोर्तुगालच्या रोनाल्डोने गोल केला होता. सर्बियाचा गोलकिपर स्टेफन मेट्रोव्हिक चेंडू पकडताना घसरला तरीसुद्धा त्याने गोल वाचविण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा गोल झाला असे टीव्ही रिप्लेवरून स्पष्ट दिसत होते.

रोनाल्डोच्या म्हणण्यानुसार चेंडू पूर्णपणे रेषेच्या आत गेला होता. पण डच सामना रेफरी सहमत नसल्याने आणि जेव्हा रोनाल्डोने गोलकरीता विचारले तेव्हा रोनाल्डोला पिवळे कार्ड दाखविण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---