---Advertisement---

मैदानातील या कृत्यामुळे रोनाल्डोने पराभूत झाल्यानंतरही जिंकली चाहत्यांची मने

---Advertisement---

फिफा विश्वचषकाच्या बादफेरीत 30 जूनला पार पडलेल्या पोर्तूगाल विरुद्ध उरुग्वे सामन्यात पोर्तूगालला 2-1 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.

या पराभवामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाचे फिफा विश्वचषक 2018 मधील आव्हानही संपुष्टात आले. पण पराभव झाला असतानाही खेलाडूवृत्ती दाखवणाऱ्या रोनाल्डोचे सोशल मिडियावर खूप कौतुक झाले.

झाले असे की उरुग्वेकडून दोन गोल करणारा एडिसन कवानी सामन्याच्या 70 व्या मिनिटादरम्यान दुखापत ग्रस्त झाला. त्यावेळी मैदानातून बाहेर जाताना रोनाल्डोने सामन्याचा वेळ वाया जातोय याकडे लक्ष न देता एडिसन कवानीला बाहेर जाण्यासाठी मदत केली.

त्याच्या या कृतीमुळे त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. चाहत्यांनी सोशल मिडियावर त्याच्या कौतुकास्पर अनेक कमेंट केल्या आहेत.

या सामन्यात उरुग्वेने मिळवलेल्या विजयामुळे त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता त्यांचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना अर्जेंटीनाला पराभूत केलेल्या फ्रान्सविरुद्ध शुक्रवारी होणार आहे.

https://twitter.com/indianbyheart54/status/1013249692791013382

https://twitter.com/mjmakkolee/status/1013255368598835200

 

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियामध्येही दिसणार पंड्या ब्रदर्स

टॉप 5: आयसीसी विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे यष्टीरक्षक

महिला हॉकी विश्वचषक: भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment