फिफा विश्वचषक 2018चा उपविजेता क्रोएशियाचा संघ त्यांना मिळालेली संपुर्ण बक्षीस रक्कम वंचित मुलांसाठी दान करणार आहेत.
पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचणारा क्रोएशिया फ्रान्सकडून 4-2 ने पराभूत झाला. 32 संघामधून उपविजेता ठरलेला क्रोएशिया संघाला 21 मिलीयन पौंड एवढी बक्षीस रक्कम मिळाली.
क्रोएशिया संघातील खेळाडू आणि संघ व्यवस्थापक ही सगळी रक्कम वंचित मुलांसाठी दान करणार आहे. जेणेकरून ती मुले उन्हाळ्याच्या सुट्टींचा आनंद घेतील.
Croatia have decided to donate all their £21m prize money and bonuses to underprivileged children so that they can go on summer holidays.
— Bolarinwa Olajide (@iambolar) July 19, 2018
https://twitter.com/JuanDirection58/status/1019725189523750912
https://twitter.com/TeamFA/status/1019252012146417664
क्रोएशिया संघ हा युरोपियन देशातील फक्त असा एकच संघ नाही ज्याने बक्षीस रक्कम दान केली. इंग्लडचे खेळाडू 2007पासून रक्कम दान करत आहे. यामुळे आतापर्यंत 300 खेळाडूंनी तब्बल 5 मिलीयन पौंड पेक्षा जास्त रक्कम दान केली आहे.
Over 10 years of @effcharity… over £5million raised, over 300 player appearances, global awareness campaigns and fundraising events… an inspired idea by the players committee back in 2007 pic.twitter.com/08OhLJDHYB
— England Footballers (@EFFCharity) July 1, 2018
तसेच विश्वविजेता फ्रान्सचा फॉरवर्ड फुटबॉलपटू कायलिन एमबाप्पे याने पाच लाख युएस डॉलर विशेष मुलांसाठी खेळाचे आयोजन करणाऱ्या चॅरीटी क्लबला दान केले आहे.
या 19वर्षीय खेळाडूला प्रत्येक सामन्यातून 22,300 युएस डॉलर मिळाले. तर 3,50,000 युएस डॉलर देशाने विजेतेपद जिंकल्याने मिळाले आहेत.
एमबाप्पेने या एका महिन्यात झालेल्या स्पर्धेत एकूण 500,000 लाख युएस डॉलर कमावले. हे सगळे पैसे त्याने प्रिमीयर डी कॉर्डी या चॅरीटी क्लबला दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–एफसी पुणे सिटी संघात रॉबिन सिंगचा समावेश
–सानिया मिर्झाचा मेसट ओझीलला पाठिंबा, वंशभेदाचा केला निषेध