पुढील वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत नवी टी२० लीग सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला या लीगपासून मोठ्या अपेक्षा आहेत. कारण, दक्षिण आफ्रिका क्रिकेटची विस्कटलेली आर्थिक घडी या लीगमूळे पुन्हा एकदा बसू शकते. आता या लीगबाबत महत्त्वाची माहिती दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने दिली आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ट्विट करत माहिती दिली की,
या लीगसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. मात्र, लिलावापूर्वी प्रत्येक संघ पाच खेळाडूंना करारबद्ध करू शकतो. कोणाला खेळाडू करारबद्ध करायचे नसतील तर ते देखील मान्य केले जाईल. आयोजकांनी ३० मार्की खेळाडूंना करारबद्ध केले आहे. या पाचपैकी तीन खेळाडू विदेशी, एक दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय व एक अनकॅप्ड खेळाडू असेल. एका संघात १७ खेळाडू असणे आवश्यक आहे. या लीगच्या प्लेइंग इलेव्हनचे प्रारूप आयपीएलप्रमाणे असेल. यात सात दक्षिण आफ्रिकेचे तर, चार विदेशी खेळाडू सहभागी असतील. आयपीएलनंतर लिलाव घेणारी ही जगातील केवळ दुसरी टी२० लीग असेल.
South Africa T20 League UPDATE 🚨
3⃣0⃣ marquee international players already signed
1⃣7⃣ player squadsSquad parameters ➡️ https://t.co/HWRr3LQpjV pic.twitter.com/i77GSy3cRs
— Proteas Men (@ProteasMenCSA) August 10, 2022
या लीगचे संचालक असलेल्या ग्रॅमी स्मिथ यांनी माहिती दिली होती की, आतापर्यंत लीगसाठी ३० मार्की खेळाडूंची नोंदणी झाली आहे. यामध्ये जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, जेसन होल्डर यांचा समावेश असल्याचे सांगितले जातेय. या लीगसाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेटने मोठी तयारी केली आहे.
विशेष म्हणजे लीगमधील सर्वच्या सर्व सहा संघ आयपीएलच्या संघमालकांनी विकत घेतलेत. यामध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद व लखनऊ सुपरजायंट्स यांचा समावेश आहे. अगदी याच वेळेस संयुक्त अरब अमिरातीमध्ये इंटरनॅशनल लीग टी२० खेळली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
अश्विनला आशिया कपसाठी निवडल्याने संतापला भारतीय दिग्गज; म्हणाला, “दरवेळी त्याला…”
सिकंदर रजाचे छातीठोक सेलिब्रेशन! शतकी खेळीच्या जोरावर संघाला मिळवून दिला विजय
रोहित-द्रविड जोडगोळीमुळे फळफळलंय ‘या’ सिनीयर खेळाडूंचं नशीब, एकटा ३ वर्षांपासून होता बाहेर