इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघ आमने-सामने होते. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत 172 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजांनी देखील घरच्या मैदानावर शानदार गोलंदाजी करताना गुजरातला रोखले. त्याचवेळी चेन्नईचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा याने दोन बळी मिळवताना आयपीएल इतिहासातील एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला.
या हंगामात आपल्या गोलंदाजीने विशेष कामगिरी करणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्यात देखील आपल्या अनुभवाचा पूर्ण वापर करत अतिशय धारदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या 4 षटकांमध्ये केवळ 18 धावा देताना दसून शनाका व डेव्हिड मिलर या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले. शनाका याला बाद करताना त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 150 वा बळी मिळवला.
यासोबतच तो आयपीएल इतिहासात 150 बळी पूर्ण करणारा पहिला डावखुरा गोलंदाज बनला. त्याच्या आधी नऊ गोलंदाजांनी 150 पेक्षा जास्त बळी आयपीएलमध्ये टिपले आहेत. हे सर्व गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करतात. जडेजाने या सामन्यात दोन बळी मिळवताना हरभजन सिंग याला मागे टाकत, 151 बळीसह सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत नववे स्थान मिळवले.
(CSK All Rounder Ravindra Jadeja becomes the first left arm bowler to take 150 wickets in IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BIG BREAKING: वेस्ट इंडिजचा बडा क्रिकेटपटू फिक्सिंग प्रकरणात निलंबित, क्रिकेटविश्वात खळबळ
एक-दोन नाही हंगामातील 10 सामन्यात धोनीने दाखवलं धाडस, गुजरातविरुद्ध उतरवली आपली खास प्लेइंग इलेव्हन