---Advertisement---

रविंद्र जडेजाच्या जिवलग ‘वीर’चे झाले निधन, भावनिक पोस्ट शेअर करत दिला निरोप

On: बुधवार, एप्रिल 21, 2021 12:26 PM
---Advertisement---

भारतीय संघातील आणि चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या घोड्याचे निधन झाले असून पोस्ट करत याबाबत त्याने माहिती दिली आहे. या पोस्टखाली भावनीक होऊन त्याने आपल्या घोड्याला शेवटचा निरोप दिला आहे.

त्याच्या प्रिय घोड्याचे नाव वीर असे होते. जडेजाने स्वत: या दुखद घटनेची माहिती दिली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर घोड्यासह अनेक फोटो शेअर करून त्याला अंतिम निरोप दिला आहे. त्याखाली त्याने ‘आम्ही एकत्रित घालवलेल्या सर्व अद्भुत आठवणींना मी सदैव लक्षात ठेवीन. त्यांना मी कधीही विसरणार नाही. माझ्या प्रिय वीर तू नेहमीच माझा आवडता राहशील. आता आराम कर.’ असे लिहले आहे.

सध्या जडेजा आयपीएल 2021 मध्ये व्यस्त असून आपल्या आवडत्या जवळच्या घोड्याला गमावल्याने त्याला नक्कीच दुःख झाले असावे. त्यामुळे जडेजाने लवकरात लवकर या दुःखद परिस्थितीतून स्वतःला सावरून आयपीएलमध्ये सीएसके संघासाठी चमकदार कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे.

https://www.instagram.com/p/CN4lan5p1KQ/?utm_source=ig_web_button_share_sheet

सीएसके आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात नुकत्याच झालेल्या सामन्यात त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. या सामन्यात दोन बळी घेत त्याने क्षेत्ररणक्ष करताना 4 झेल घेतले होते. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक देखील झाले होते. सीएसकेने हा सामना 45 धावांनी जिंकत या स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदविला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहितसाठी ओला चेंडू बदलला, मग राहुलसोबतचं अन्याय का? भारतीय दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न

मुंबई इंडियन्सचा ‘स्पेशल शिलेदार’, जो पूर्ण हंगामात केवळ २ सामने खेळायचे घेतो ५ कोटी; जाणून घ्या कोण आहे तो?

मिश्राजींपुढे मुंबईचे लोटांगण, भल्याभल्या फलंदाजांच्या ‘अशा’ चटकावतो विकेट्स; स्वत:च केला उलगडा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---