इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या पुढील हंगामासाठी, सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा पुन्हा एकदा चार वेळचे आयपीएल विजेते चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी फ्रँचायझी आणि जडेजा यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या. त्यामुळे यावेळेस जडेजा चेन्नईत दिसणार नाही, असे आडाखे बांधले जात होते. मात्र, चेन्नईने त्याला आपल्या संघात कायम ठेवल्याने या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
गेल्या वर्षी जडेजाला सीएसकेचा कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, संघाच्या खराब कामगिरीनंतर जडेजाने हंगामाच्या मध्यात कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर माजी कर्णधार एमएस धोनीने पुन्हा कर्णधारपदाचा भार स्वीकारलेला. त्याचवेळी जडेजाला दुखापत झाल्याने तो हंगामातील अखेरचे काही सामने खेळू शकला नाही. तेव्हापासून जडेजा आणि सीएसकेमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या येत होत्या. तसेच, जडेजाने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून सीएसकेच्या सर्व पोस्टही हटवल्या होत्या.
Always and Forever! 💛♾ https://t.co/AC3Q9TzFI6
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 15, 2022
कायम केलेल्या खेळाडूंची यादी समोर आल्यानंतर जडेजाने स्वतःचे आणि धोनीचे एक छायाचित्र ट्विट केले. यात जडेजा हसत हसत धोनीला अभिवादन करताना दिसून येतोय. या छायाचित्रासोबत जडेजाने लिहिले की, ‘सर्व ठीक आहे. रिस्टार्ट.’
हे ट्विट सीएसकेने रिट्विट केले आहे नेहमी आणि कायम’ असे कॅप्शन दिले.
जडेजा 2012 पासून चेन्नई संघाचा मुख्य खेळाडू आहे. केल्यानंतर तो दोन वर्ष गुजरातसाठी खेळलेला. खेळाच्या तीनही विभागात तो आपले पूर्ण योगदान देत असल्याने, धोनी नेहमीच त्याच्यावर विश्वास ठेवताना दिसला आहे.
(CSK And Jadeja Patch Up Before IPL 2023 Jadeja Thankful Tweet)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केन विलियम्सनने ‘या’ भारतीय गोलंदाजाबद्दल काढले गौरोद्गार, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
‘ही’ गोष्ट बदला, कर्णधार बदलून काय होणार, टीम इंडियाला इरफान पठाणचा सल्ला
आयपीएल 2023 आधी मुंबईने या खेळाडूंना दिला नारळ; रोहितच्या नेतृत्वात हे 15 शिलेदार कायम