इंडियन प्रीमीयर लीग २०२२ (IPL 2022) सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. शनिवारपासून (२६ मार्च) आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होणार असून या हंगामातील पहिला सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात होणार आहे. या सामन्यात सीएसकेचा नवा कर्णधार रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केकेआरचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पहिल्यांदाच आमने सामने असतील. दोन्हीही कर्णधार हा सामना जिंकण्यासाठी आपले सर्वश्रेष्ठ देतील.
दरम्यान सीएसके आणि केकेआर (CSK vs KKR) संघातील आकडेवारी पाहता, सीएसकेचे पारडे केकेआरपेक्षा जड (CSK And KKR Head To Head Records) आहे. आतापर्यंत सीएसके आणि केकेआर संघ आयपीएलमध्ये २५ वेळा एकमेकांविरुद्ध भिडले आहेत. यापैकी १७ सामने सीएसकेने तर ८ सामने केकेआरने जिंकले आहेत. अर्थात सीएसकेने केकेआरपेक्षा दुप्पटीने जास्त सामने जिंकले आहेत.
मागील हंगामातील उभय संघांच्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२१ मध्ये ३ सामने खेळले गेले होते. त्यातील तिन्हीही सामने सीएसकेने जिंकले होते. यामध्ये अंतिम सामन्याचाही समावेश होता.
धोनीने केकेआरच्या गोलंदाजांचा घेतलाय समाचार
सीएसकेच्या वर्तमान संघाकडून केकेआरविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम एमएस धोनीने केला आहे. त्याने २४ डावांमध्ये ३९ च्या सरासरीने फलंदाजी करताना केकेआरविरुद्ध ५०१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १३३ इतका राहिला आहे. तर अंबाती रायुडू ४२८ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. केकेआरविरुद्ध ड्वेन ब्रावो हा सीएसकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज राहिला आहे. त्याने या संघाविरुद्ध २२ धावा देत ३ विकेट्स घेण्याची सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्याच्यानंतर फिरकीपटू आणि कर्णधार जडेजाने केकेआरच्या १८ विकेट्स घेतल्या आहेत.
रसेलने सीएसकेच्या गोलंदाजांचा काढलाय घाम
दुसरीकडे केकेआरकडून सीएसकेविरुद्ध आंद्रे रसेलने सर्वात चांगले प्रदर्शन केले आहे. त्याने आतापर्यंत सीएसकेविरुद्ध १० डावांमध्ये ४३ च्या सरासरीने फलंदाजी करताना ३०० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ४ अर्धशतकांचाही समावेश आहे. तसेच फिरकीपटू सुनिल नरेन याने सीएसकेच्या सर्वाधिक फलंदाजांना बाद केले आहे. त्याने सीएसकेच्या आतापर्यंत २० विकेट्स घेतल्या आहेत. तसेच सीएसकेविरुद्ध त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ४१ धावांवर ३ विकेट्स इतकी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अगग! बड्डेला ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचा फक्त डक नव्हे तर डकचा नकोसा विश्वविक्रम, वाचा सविस्तर
नव्वदवर ८ विकेट्स, संकटात असलेल्या इंग्लंडचे गोलंदाज सॉलिड खेळले; फलकावर २०० धावा लावूनच गेले