---Advertisement---

जड्डूचा ‘सर’ जडेजा करण्यात माही भाईचाच आहे सिंहाचा वाटा; बोटाला धरून शिकवलंय

On: गुरूवार, मार्च 24, 2022 7:45 PM
Ravindra Jadeja and MS Dhoni
---Advertisement---

चातक पक्षाप्रमाणे चाहते इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या हंगामाची वाट पाहत आहेत. या हंगामाला अवघे २ दिवस शिल्लक राहिले आहेत. अशात आयपीएल चाहत्यांसाठी एक हैराण करणारी बातमी आली. ती म्हणजे, एमएस धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडल्याची. त्यामुळे संघाने त्याच्या जागी ‘सर’ रवींद्र जडेजाच्या हाती चेन्नईची धुरा सोपवली. आता जडेजा आयपीएल २०२२मध्ये नव्या जबाबदारीसह मैदानात उतरणार आहे. मात्र, तत्पूर्वी आपण जडेजाला ‘सर’ हे नाव कसे पडले किंवा त्याला ‘सर’ या टोपणनावाने का बोलावले जाते हे या मागील खरी कहाणी या लेखातून जाणून घेणार आहोत.

खंरतर एखाद्या व्यक्तीला नाईटहुड मिळाली की, त्याच्या नावापुढे ‘सर’ असं लावले जाते. पण जडेजाच्या (Ravindra Jadeja) बाबतील कहाणी अगदी वेगळी आहे. अनेकदा जडेजाला चाहते ‘सर जडेजा’ म्हणतात. अनेक मुलाखतींमध्येही त्याच्याबद्दल बोलताना ‘सर रवींद्र जडेजा’ असं म्हणल्याचे ऐकले असेल. आता अनेकांना असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल की, जडेजाला ‘सर’ हे टोपणनाव खुद्द माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने दिले होते, पण हे खरे आहे.

झाले असे की, २०१३ साली आयपीएलवेळी (IPL 2013) धोनीने एका पाठोपाठ काही ट्वीट्स केले होते. त्यात त्याने जडेजाचा ‘सर’ हे टोपणनाव दिले होते. धोनीने ट्वीट केले होते की, ‘सर जडेजा झेल घेण्यासाठी पळत नाही, तर चेंडू स्वत:च त्याला शोधतो आणि सरळ त्याच्या हातात जातो.’

तसेच धोनीने आणखी एक ट्वीट केले होते, ज्यात लिहिले होते की, ‘सर जडेजा जेव्हा त्याची जीप चालवतो, तेव्हा जीप आहे तिथेच थांबते आणि रस्ता चालायला लागतो. आणि जेव्हा तो फलंदाजीला जातो, तेव्हा पूर्ण पॅव्हेलियनच खेळपट्टीजवळ जाते.’

याशिवाय देखील धोनीने ‘सर जडेजा’ असं म्हणत केले ट्वीट खूप व्हायरल झाले होते. त्यातील आणखी एक ट्वीट असे होते की, ‘रजनीकांत सर वयस्कर होत आहेत, त्यामुळे त्यांनी सर रवींद्र जडेजाला तयार केले.’ खरंतर जडेजा आणि धोनी मैदानाबाहेरही चांगले मित्र आहेत. तसेच ते भारतीय संघाकडून आणि चेन्नई सुपर किंग्स संघाकडून एकत्र खेळले आहेत. त्याचमुळे धोनीने जडेजाबद्दल असे मजेशीर ट्वीट केले होते.

धोनीच्या या मजेशीर ट्वीट्समुळे २०१३ पासून जडेजाच्या नावाला सर हे टोपणनाव चिकटले. तेव्हापासून अनेकदा जडेला ‘सर जडेजा’ असं संबोधले जाते.

जडेजा आहे तुफान फॉर्ममध्ये 
सध्या जडेजा तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने मोहाली कसोटीत नाबाद १७५ धावा केल्या आणि ९ विकेट्सही घेतल्या. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. तसेच जडेजा आयपीएल २०२२ मध्ये पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सकडून धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिसणार आहे. त्याला चेन्नईने १६ कोटींमध्ये संघात कायम केले आहे. तसेच धोनीला १२ कोटी रुपयांमध्ये संघाने कायम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘थाला’वर रूसला ‘चिन्नाथाला’? जडेजाला शुभेच्छा देताना धोनीबाबत रैनाने केले असे काही, सर्वांनाच बसलाय धक्का!

थलायवन इरुकिंद्रन! सीएसकेच्या नव्या कर्णधाराची आली पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाला जडेजा

‘जड्डू’च का? चेन्नईने धोनीचा उत्तराधिकारी म्हणून जडेजाला निवडण्याचे ‘हे’ आहे खास कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---