एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएलच्या आगामी हंगामाच्या तयारीत व्यस्त झाला आहे. कर्णधार एमएस धोनी आणि संपूर्ण सीएसके संघ सध्या आगामी हंगामाच्या पर्श्वभूमीवर सुरतमध्ये घाम गाळत आहे. आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी सीएसकेने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये धोनी मोठमोठे शॉट्स खेळताना दिसत आहे.
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या सामन्यासह आयपीएल २०२२ (IPL 2022) ची सुरुवात होणार आहे. मागच्या हंगामात सीएसकेने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) उपविजेता संघ ठरला होता. याच पार्श्वभूमीवर आगामी हंगामाचा पहिला सामना या दोन संघांमध्ये खेळला जाईल. हा सामना २६ मार्चला मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे.
एमएस धोनी (MS Dhoni) आणि याच्या नेतृत्वाती सीएसके संघ, सुरतच्या लालाभाई कॉन्ट्र्रॅक्टर स्टेडियममध्ये (Lala Bhai Contractor Stadium Surat) सराव करत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार सीएसके संघ व्यवस्थापनाने धोनीच्या सांगण्यावरूनच सुरतमध्ये संघाचा प्री कँप लावला. यामागे धोनीचा असा विचार होता की, मुंबई आणि सुरतमधील खेळपट्टी जवळपास एकसारखी आहे आणि खेळाडूंना याचा फायदाच होईल. या ठिकाणी धोनी तुफान फटकेबाजी करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सीएसकेचे चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना सराव करताना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येऊ शकतात. याच्यावरून असेच समजते की, चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळू शकतो. या सराव सत्रामुळे आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खेळाडूंना एकमेकांसोबत बोलण्या-चालण्याची अधिक संधी मिळणार आहे. संघातील युवा खेळाडू दिग्गज एमएस धोनी, ड्वेन ब्रावो आणि रवींद्र जडेजा यांच्यासारख्या खेळाडूंसोबत वेळ घालवून खूप काही शिकू शकतात.
One handed six @msdhoni ???????? pic.twitter.com/DkO6X7CDcx
— DIPTI MSDIAN (@Diptiranjan_7) March 7, 2022
सीएसकेच्या कँपमध्ये २५ ते ३० खेळाडू सहभागी आहेत. तसेच सपोर्ट स्टाफ, मेडिकल स्टाफ, सीएसकेच्या संघ व्यवस्थापनातील सदस्य याच ठिकाणी उपस्थित राहतील. स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश दिला गेला असला, तर खेळाडू मात्र कडक बायो बबलचे पालन करत आहेत. बायो बबलमध्येच त्यांचा सराव सुरू आहे.