---Advertisement---

सीएसकेचा मोठा निर्णय! सुवर्ण विजेत्या नीरजला देणार एक कोटी आणि ‘ही’ खास भेट

---Advertisement---

टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमधून शनिवारी (७ ऑगस्ट) भारत देशासाठी एक ऐतिहासिक बातमी समोर आली. भारताचा पुरुष भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारताच्या ऑलिम्पिक इतिहासातील ऍथलेटिक्स प्रकारातील पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून दिले. यासोबतच भारताच्या कोणत्याही खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये १३ वर्षानंतर सुवर्णपदक जिंकले. या सुवर्ण पदकानंतर संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारांनी त्याला बक्षिसे जाहीर केली. आता आयपीएलमधील माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्स संघांने देखील नीरजला एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.

नीरजने जिंकले सुवर्णपदक
ऑलिम्पिकमध्ये जाण्यापूर्वी नीरज चोप्रा याला पदकाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. नीरजने या सर्व अपेक्षा पूर्ण करत हे सुवर्ण पदक भारताच्या पदरात टाकले. अंतिम फेरीतील सहा प्रयत्नांपैकी दुसऱ्या प्रयत्नातच ८७.५८ मीटरचा भाला फेकून त्याने आपले एक पदक निश्चित केले होते. त्याचे विरोधी खेळाडू इथपर्यंत पोहोचू न शकल्याने नीरज सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. हे भारताचे ऑलिम्पिक इतिहासातील ऍथलेटिक्स क्रीडा प्रकारातील पहिलेच सुवर्ण आहे.

सीएसके देणार एक कोटी रुपये
नीरज चोप्रा याने ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावल्यानंतर इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) प्रमुख संघ चेन्नई सुपर किंग्सने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून घोषणा करताना म्हटले, ‘नीरजच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक आणि सन्मान म्हणून चेन्नई सुपर किंग्स नीरजला एक कोटी रुपये कोटी देईल.’ यासोबतच चेन्नई संघातर्फे नीरजला ८७५८ क्रमांकाची जर्सी देखील भेट देण्यात येईल. नीरजने सुवर्णपदक जिंकताना ८७.५८ मीटर भाला फेकला होता.

बीसीसीआयने देखील केली बक्षिसांची घोषणा
ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या नीरजला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) एक कोटी, रौप्यविजेत्या मिराबाई चानू व रवी कुमार यांना प्रत्येकी ५० लाख तसेच कांस्य विजेत्या पी व्ही सिंधू, बजरंग पूनिया व लवलीना बोरगोहेन यांना २५ लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. ४१ वर्षानंतर ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाला १ कोटी २५ लाख रुपये बीसीसीआयतर्फे देण्यात येतील.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताविरुद्ध खणखणीत वाजणारे नाणं म्हणजे जो रूट, एकदा हे आकडे पाहा सर्व समजून जाल

बीसीसीआयची मोठी घोषणा, ऑलिम्पिक विजेत्यांना देणार ‘इतक्या’ रकमेचे रोख पारितोषिक

भारतीयांसाठी भावूक क्षण! १३ वर्षानंतर वाजले ऑलिम्पिकमध्ये भारताचे राष्ट्रगीत, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---