चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2019 ची सुरुवात सलग दोन विजयांनी धमाकेदार केली असली तरी लूंगी एन्गिडी आणि डेव्हिड विली या त्यांच्या गोलंदाजांनी आयपीएल 2019 मधून माघार घेतल्याने त्यांना सुरुवातीलाच दोन धक्के बसले आहेत.
आयपीएल सुरु होण्याआधीच लुंगी एन्गिडी दुखापतग्रस्त असल्याने आयपीएलमधून बाहेर पडला होता. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी डेव्हिड विलीनेही कौटुंबिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे.
पण आता चेन्नई सुपर किंग्सने शनिवारी(30 मार्च) एन्गिडीच्या ऐवजी बदली खेळाडू म्हणून न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू स्कॉट कुगलेजिनची निवड केली आहे.
याबद्दल चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेंमिंग यांनी सांगितले की, ‘एन्गिडीच्या जागेवर आणि किंमतीनुसार आम्ही वेगळ्या स्तरावरील खेळाडूची निवड केली आहे. आम्ही स्कॉट कुगेलजिनची निवड केली आहे. तो न्यूझीलंडकडून खेळतो आणि वेगवान गोलंदाजीबरोबरच चांगली फलंदाजीही करतो. आम्ही अशा अष्टपैलू क्रिकेटपटूची निवड केली आहे. तो पुढील आठवड्यात संघात सामील होईल.’
त्याचबरोबर विलीच्या ऐवजी कोणाचीही निवड करणार नसल्याचेही फ्लेमिंग यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की ‘डेव्हिडची व्यक्तिगत समस्या आहे आणि आम्ही त्याचे पुर्णपणे समर्थन करत असून त्याला पुढेही पाठिंबा देऊ.’
एन्गिडीऐवजी निवड झालेला 27 वर्षीय कुगलेजिनने याचवर्षी जानेवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण केले होते. तसेच 2017 मध्ये त्याने आयर्लंड विरुद्ध वनडे पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत न्यूझीलंडकडून 2 वनडे आणि 4 टी20 सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्याने 5 आणि टी20 मध्ये 2 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचबरोबर त्याने त्याच्या कारकिर्दीत 75 टी20 सामने खेळले असून यात 67 विकेट्स घेतल्या आहेत.
The answer to every #SuperFan's question in the last couple of days: Scott Kuggeleijn from Hamilton, New Zealand! #LionAlert #KuluKuluKuggeleijn #WhistlePodu #Yellove ????????
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 30, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–पंजाबविरुद्ध पराभवानंतर रोहित शर्माला झाला लाखो रुपयांचा दंड…
–आर अश्विनने एकाच षटकात टाकले चक्क सात चेंडू…
–युसुफ पठाणने अर्धशतक केले तर या चाहत्याच्या रिक्षातून प्रवाशांचा होणार विनामुल्य प्रवास…