आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी 19 डिसेंबर रोजी मिनी लिलाव होणार आहे. लिलावापूर्वी, बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी 26 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्यास सांगितले होते. लिलावापूर्वी, फ्रँचायझी अजूनही इतर संघातील खेळाडूंना अधिक पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या संघात सामील होण्यासाठी ऑफर देत आहेत.
मात्र, त्यासाठी गुप्त पद्धतीने खेळाडूंशी संपर्क साधला जात आहे. सोशल मीडियावर अशी अफवा पसरली आहे की, चेन्नई सुपर किंग्जचा युवा वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराना (Mathisha Pathirana) यालाही एका फ्रेंचायझीने संपर्क साधला आहे. या अफवांच्या दरम्यान, त्याने एक पोस्ट शेअर केली जी चर्चेत आहे. 20 वर्षीय गोलंदाजाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “पैसा कधीही ईमानदारी विकत घेऊ शकत नाही.”
सीएसकेने आयपाएलच्या च्या 17 व्या हंगामासाठी पाथीरानाला रिटेन केले आहे. 16व्या हंगामात त्याने 8 च्या इकॉनॉमी रेटने धावा खर्च करताना 12 सामन्यात 19 विकेट्स घेतल्या होत्या. एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली त्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळेच चेन्नईने त्याला कायम ठेवले आहे.
विश्वचषक 2023 स्पर्धेत पाथीरानाची कामगिरी अत्यंत खराब होती. खांद्याला दुखापत होण्याआधी तो स्पर्धेत दोन सामने खेळला होता, ज्यामध्ये त्याने फक्त दोन विकेट्स घेतल्या होत्या. तर आशिया चषक 2023 मध्ये त्याने शेवटच्या षटकांमध्ये शानदार गोलंदाजी केली आणि सहा सामन्यांमध्ये त्याने 11 विकेट्स घेतल्या.
विशेष म्हणजे चेन्नईने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करत आयपीएल 2023 मध्ये पाचवे विजेतेपद पटकावले. आयपीएल 2024 साठी होणाऱ्या मिनी लिलावासाठी चेन्नईकडे 31 कोटी 40 लाख रुपये शिल्लक आहेत. चेन्नई संघात सहा जागा रिक्त आहेत. (CSK bowler’s sensational post on rumors of being approached by other franchises Said Honesty comes with money)
महत्वाच्या बातम्या
‘IPLने Impact Player Rule रद्द करावा, भारतीय फलंदाज…’, माजी दिग्गजाने का दिला असा सल्ला? घ्या जाणून
LLC 2023 । मणिपाल टायगर्सने पहिल्यांदा जिंकली ट्रॉफी, हरभजनकडून रैनाच्या संघाला फायनलमध्ये मात