येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ (indian premier league) स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धपूर्वी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. ज्यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू सहभाग घेणार आहेत. आयपीएल स्पर्धेत ४ वेळेस जेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज (Chemnai super kings) संघाने या हंगामासाठी ४ खेळाडूंना रिटेन केले आहे. ज्यामध्ये एमएस धोनी (Ms dhoni), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि मोईन अली (Moeen ali) यांचा समावेश आहे. यासह चेन्नई सुपर किंग्ज संघ येणाऱ्या हंगामात आणखी चांगल्या खेळाडूंना संधी देण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
चला तर पाहूया असे खेळाडू, ज्यांना ७ ते ८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज बोली लावू शकतात. (mega auction 2022)
१) फाफ डू प्लेसिस (Faf du plessis): या यादीत सर्वोच्च स्थानी आहे तो दिग्गज फलंदाज फाफ डू प्लेसिस. हा एक असा खेळाडू आहे ज्याला चेन्नई सुपर किंग्स संघ कुठल्याही परिस्थितीत आपल्या संघात घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. गेल्या ४ वर्षांपासून तो या संघाचे प्रतिनिधित्व करतोय. आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील त्याने अप्रतिम फलंदाजी केली होती. तो ऑरेंज कॅप पटकावण्यापासून केवळ २ धावा दूर राहिला होता. त्याची या स्पर्धेतील कमगिरी पाहता त्याला पुढील हंगामात देखील चेन्नई सुपर किंग्ज संघ आपल्या संघात स्थान देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्याने १४ व्या हंगामात ६३३ धावा केल्या होत्या.
२) दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) : या यादीत दुसऱ्या स्थानी आहे, भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज दिनेश कार्तिक. जो एक उत्कृष्ट यष्टिरक्षक फलंदाजासह एक उत्तम कर्णधार देखील आहे. काही वर्षे कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व केल्यानंतर त्याने १४ व्या हंगामात कर्णधार पदावरून पायउतार केला होता. आगामी हंगागासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला रिलीज केले आहे. ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघ त्याला आपल्या संघात स्थान देण्याचा विचार करू शकतात. एमएस धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघ यष्टिरक्षक फलंदाज आणि कर्णधाराच्या शोधात असणार आहे. ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघ दिनेश कार्तिकवर मोठी बोली लावू शकते.
३) आर अश्विन (R ashwin) : आर अश्विन हा भारतीय संघातील दिग्गज फिरकीपटू आहे. गेल्या काही वर्षांपासून तो दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. परंतु आगामी हंगामासाठी त्याला रिलीज करण्यात आले आहे. अशातच चेन्नई सुपर किंग्ज संघ त्याच्यावर बोली लावू शकतो. अनेक वर्ष त्याला भारतीय टी२० संघात स्थान देण्यात आले नव्हते. परंतु नुकताच पार पडलेल्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत त्याला स्थान देण्यात आले होते. या स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. तसेच काही वर्ष त्याने या संघाचे प्रतिनिधित्व देखील केले आहे.
४) शार्दुल ठाकूर (Shardul thakur) : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने चेन्नई सुपर किंग्ज संघाला चौथे जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आता तो मेगा ऑक्शनमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघ त्याला आपल्या संघात पुन्हा एकदा समाविष्ट करून घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तो वेगवान गोलंदाजीसह तुफान फटकेबाजी देखील करतो. सर्व संघांना फक्त ४ खेळाडू रिटेन करण्याची अनुमती देण्यात आली होती. त्यामुळेच शार्दुल ठाकूरला रिलीज करण्यात आले होते.
५) शाहरुख खान (Sharukh khan): या यादीत शेवटच्या स्थानी आहे युवा फलंदाज शाहरुख खान. ज्याला गेल्या हंगामात पंजाब किंग्ज संघाने ५.२५ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिले होते. या हंगामात त्याने अप्रतिम कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ८ सामन्यात २५३ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने २ अर्धशतक झळकावले होते. ही कामगिरी पाहता, आगामी हंगामात त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघात स्थान दिले जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :
‘पालघर एक्सप्रेस’ सुसाट! सात बळी मिळवत जोहान्सबर्गमध्ये गाजवली सत्ता
हे नक्की पाहा :