आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वीच अनेक मोठ्या उलथापालथी होताना दिसत आहेत. अलीकडेच 26 सप्टेंबर रोजी वेस्ट इंडिजचा सुपरस्टार ड्वेन ब्राव्होने सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर लगेचच कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आयपीएल 2025 साठी मार्गदर्शक म्हणून संघात समाविष्ट केले. याआधी तो चेन्नई सुपर किंग्जमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. आता यानंतर सीएसके संघात नवीन गोलंदाजी प्रशिक्षकाबाबत खळबळ माजली आहे.
या बातमीद्वारे आपण अश्या 3 दिग्गज क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊयात, ज्यांचा सीएसके कॅम्पमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून समावेश केला जाऊ शकतो. या तिघांपैकी कोणीही आगामी मोसमात सीएसके संघात दिसू शकतो.
3.अल्बी मॉर्केल
अल्बी मॉर्केल हा दक्षिण आफ्रिकेचा माजी अनुभवी खेळाडू आहे. ज्याला मोठ्या सामन्यांचा अनुभव आहे. 2008 ते 2013 च्या आयपीएल हंगामात तो चेन्नई सुपर किंग्ज संघाकडूनही खेळला आहे. संपूर्ण 6 आयपीएल हंगाम खेळण्याचा अनुभव असलेल्या मॉर्केलला त्यांच्या संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून घेण्याचा सीएसके विचार करू शकते. मॉर्केल सध्या चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग याच्यासोबतही क्रिकेट खेळला आहे. अशा परिस्थितीत हे दोघे एकत्र आल्यास संघाला अधिक बळ मिळू शकते.
2. अनिल कुंबळे
भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे हा सीएसकेसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणारा अनिल कुंबळे 2016 आणि 2017 मध्ये भारतीय संघाचा प्रशिक्षकही होता. 2020-22 या काळात तो आयपीएलमध्ये पंजाब संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. कुंबळेची सीएसकेच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यास त्याचा खूप फायदा होऊ शकतो.
1.भारत अरुण
आयपीएल 2024 पर्यंत केकेआरसाठी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावत असलेल्या भरत अरुणची रवानगी ड्वेन ब्राव्होच्या आगमनानंतर होऊ शकते. भारत 2014 ते 2016 आणि 2017 ते 2021 पर्यंत टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रशिक्षण देण्याचा मोठा अनुभव आहे. ज्याचा सीएसके संघ फायदा घेऊ शकतो. जर तो केकेआर मधून मुक्त झाला तर चेन्नईला नक्कीच त्याला सोबत आणायला आवडेल.
हेही वाचा-
मुशीर खानच्या अपघाताबाबत महत्त्वाचं अपडेट, हॉस्पिटलनं जारी केलं पहिलं स्टेटमेंट
‘क्रिकेटपटूंना कमांडोप्रमाणे…’, पाऊस पडल्यास ड्रेसिंग रुममधील स्थितीबाबत आरपी सिंगचा खुलासा
कानपूर कसोटीला पावसानं झोडपलं, दुसऱ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द