मुंबई । आयपीएलच्या तिसर्या हंगामात म्हणजेच 2010 साली चेन्नई सुपर किंग्जने दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आणि यावेळी विजेतेपदही जिंकले होते. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना चेन्नईने प्रथमच आयपीएलचे विजेतेपद जिंकले.
२०१० आयपीएल हंगामातील पहिल्या उपांत्य सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मुंबईने 35 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तर आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने डेक्कन चार्जर्सला 38 धावांनी पराभूत केले होते.
धोनीच्या नेतृत्वात खेळताना सीएसकेने सचिन तेंडुलकरच्या मुंबई इंडियन्सचा 22 धावांनी पराभव करून प्रथमच आयपीएल विजेतेपद जिंकले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने सुरेश रैनाच्या 57 आणि मुरली विजयने 26 धावांच्या मदतीने 20 षटकांत 5 गडी गमावून 168 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने प्रत्युत्तरादाखल 9 गडी गमावत केवळ 146 धावा केल्या.
अंतिम सामन्यातही सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 45 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 48 धावांची खेळी केली आणि मालिकावीर ठरला.
तिसर्या हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरला ऑरेंज कॅप मिळाली होती. त्याने संपूर्ण हंगामात धमाकेदार खेळी करत 618 धावा केल्या. दुसरीकडे, डेक्कन चार्जर्सच्या प्रज्ञान ओझाने पर्पल कॅप जिंकली. ओझाने 16 सामन्यांत 21 गडी बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने रचला धावांचा डोंगर; पाकिस्तान पुन्हा ‘बॅकफूट’वर
-सीपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावांचे आव्हान पूर्ण करण्यात ‘या’ संघाला अपयश
ट्रेंडिंग लेख-
-आपल्या समालोचनातून चौफेर फटकेबाजी करणारा ऍलन विल्किंंस
-क्रिकेटपटू म्हणून नाव कमावूनही नेहमीच स्वत: ला एक शिक्षक मानणारा क्रिकेटर
-जेव्हा भारतीय क्रिकेटचे पितामह रणजीतसिंग यांनी एकाच दिवशी केली होती २ शतके…