---Advertisement---

‘सर्वोत्तम झेल पुरस्कार मला द्यायला हवा होता’, धोनीने स्वतः बोलून दाखवली इच्छा

On: शनिवार, एप्रिल 22, 2023 5:17 PM
---Advertisement---

आयपीएल 2023 हंगामातील 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) व सनरायझर्स हैदराबाद हे संघ समोरासमोर आलेले. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने एकतर्फी वर्चस्व गाजवले. गोलंदाजांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीनंतर सलामीवीरांनी दिलेल्या 87 धावांच्या सलामीनंतर चेन्नईने 7 गडी राखून विजय नोंदवला. चेन्नईचा हंगामातील हा हंगामातील चौथा विजय ठरला. पारितोषिक वितरण समारंभात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने आपली नाराजी देखील व्यक्त केली.

धोनी हा या सामन्यात कर्णधार तसेच यष्टिरक्षक म्हणून चांगलाच सक्रिय दिसला. त्याने एक झेल, एक यष्टिचित व अखेरच्या चेंडूवर एक धावबाद केला. महिश तिक्षणा याच्या एका अप्रतिम चेंडूवर हैदराबाद संघाचा कर्णधार ऐडन मार्करम हा चकला व त्याने जोरदार कट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीशा वेगवान असलेल्या या चेंडूने बॅटची कड घेतली व धोनीने यष्टयांच्या अगदी जवळ एक अप्रतिम झेल पूर्ण केला.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1649470141003079681?t=AtFi6kDdGQGokiZ73cWyDQ&s=19

 

आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यातील एका उत्कृष्ट झेल पकडणाऱ्याला पारितोषिक दिले जाते. या सामन्यात ते पारितोषिक ऋतुराज गायकवाड याला दिले गेले. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात हर्षा भोगले यांच्याशी संवाद साधताना धोनी म्हणाला,

‘तुम्ही सर्वोत्कृष्ट झेल पकडण्याचे पारितोषिक मला दिले नाही. मला वाटते तुझे उत्कृष्ट होता.’ असे म्हटल्यानंतर धोनीने एक स्मितहास्य केले.

या सामन्याचा विचार केल्यास चेन्नईच्या सर्वच गोलंदाजांनी बहारदार कामगिरी करत हैदराबादला 134 पर्यंत रोखले. या धावांचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांनी 87 धावांची भागीदारी करत चेन्नईचा विजय सोपा केला. तीन बळी मिळवणाऱ्या रवींद्र जडेजा याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

(CSK Captain MS Dhoni Completing About Not Getting Best Catch Award Agaist Sunrisers Hyderabad)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयपुढे नमलं पाकिस्तान! आशिया चषकासाठी आला नवीन प्रस्ताव, जाणून घ्याच
नाणेफेक जिंकत गुजरात संघाचा फलंदाजीचा निर्णय, चौथ्या विजयासाठी पंड्यासेना सज्ज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---