इंडियन प्रीमिअर लीग 2023मधील 49वा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात शनिवारी (दि. 6 मे) पार पडला. या सामन्यात पाच वेळच्या आयपीएल चॅम्पियन चेन्नईने चार वेळच्या चॅम्पियन मुंबईला 6 विकेट्सने धूळ चारली. चेन्नईच्या या विजयात युवा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना याचा सिंहाचा वाटा राहिला. सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने त्याचे विशेष कौतुक केले. तसेच, कारकीर्द वाढवण्यासाठी त्याला सल्लादेखील दिला.
यावेळी चेन्नईकडून शानदार गोलंदाजीचे दर्शन घडले. मुंबईला 139 धावांवर रोखण्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) याने मोलाचा वाटा उचलला. त्याने यावेळी 4 षटके गोलंदाजी करताना फक्त 15 धावा खर्च करत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. सामन्यानंतर बोलताना धोनी त्याच्याबद्दल म्हणाला,
“मला वाटते की त्याने लाल चेंडूच्या क्रिकेटच्या जवळपासही जाऊ नये. वनडे क्रिकेट देखील कमी खेळावे. तसेच केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये भाग घ्यावा. श्रीलंका क्रिकेटने त्याच्यावर लक्ष ठेवावे. तो भविष्यात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल.”
पथिराना याची गोलंदाजी शैली श्रीलंकेचाच दिग्गज लसिथ मलिंगा याच्यासारखी दिसून येते. त्यामुळे त्याला बेबी मलिंगा असे देखील संबोधले जाते.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावत 139 धावा केल्या होत्या. मुंबईसाठी सर्वाधिक धावा नेहाल वढेरा याने केल्या. त्याने यावेळी 51 चेंडूत 64 धावांची खेळी साकारली. यामध्ये 1 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेन्नईकडून पथिराना याने धमाकेदार प्रदर्शन करत 4 षटकात 15 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनीही शानदार फटकेबाजी केली. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 30 आणि डेवॉन कॉनवे याने 44 धावांचे योगदान दिले. चेन्नईने चार गडी गमावत हे आव्हान पार केले.
(CSK Captain MS Dhoni Suggest Matheesha Pathirana Play Less Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लाईव्ह सामन्यात आरसीबीचा पुन्हा राडा! वॉर्नर आणि सॉल्टशी भिडला सिराज
50- 50 आणि 50! विराटने जुळवला ‘हा’ अनोखा योगायोग, वाचून तुम्हीही कराल कौतुक