इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सत्रातील 12 व्या सामन्यात सोमवार (19 एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 45 धावांनी पराभव केला. या सत्रातील चेन्नई संघाचा हा सलग दुसरा विजय असून या सामन्यात चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 17 चेंडूत 18 धावा केल्या. या कमी वेगाच्या खेळीमुळे माझ्या संघाला फटका बसला असता, अशी कबुली धोनीने दिली आहे.
राजस्थानविरुद्ध धोनीने दोन चौकारांच्या मदतीने 17 चेंडूत 18 धावा फटकावल्या. त्यामुळे सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला की, “मी खेळलेले पहिले 6 चेंडू या सामन्यात आमच्यासाठी खूपच महागडे ठरले असते. यामुळे आमच्यावर पराभूत होण्याची वेळही आली असती. परंतु या मोसमात बरेच काही बदलले आहे. आम्ही ज्याप्रकारची तयारी केली आहे. तसे आम्ही एक संघ म्हणून एकत्र आलो आहोत. परंतु आम्ही 180 पेक्षा जास्त धावा केल्याचा मला आनंद आहे. तरीही आम्ही यापेक्षाही अधिक धावा केल्या असत्या असे मला वाटते.”
तसेच पुढे तो म्हणाला की, “मी नेहमी सामन्यादरम्यान संघातील खेळाडूंना काय सूचना देणे योग्य असेल हे मी पाहतो. कारण आपण जर असे केले तर ते नेहमी चांगले खेळतात. यावेळी दीपक चाहरची नकल चेंडूवर काहीसी चूक झाली. त्यामुळे मला चांगली सुरुवात करणे अधिक महत्त्वाचे आहे असे वाटले. चेंडू ओला झाल्यामुळे फिरत होता, म्हणूनच मला जोश बटलरचे रिव्हर्स स्वीप खेळणे काही आश्चर्यकारक वाटले नाही. जर ओला चेंडू फिरत असेल तर कोरडाही फिरू शकतो असे मला वाटले. मोईन अली संघात होता ते एक चांगले होते, तोसुद्धा बऱ्यापैकी चेंडू फिरवत होता. त्यामध्ये खेळपट्टीही थोडीशी चिकट झाली होती. परंतु गेल्या हंगामात गोलंदाजांवरही दबाव होता त्यामुळे अशा परिस्थितीची त्यांना सवय झाली आहे. ”
आपले वय आणि तंदुरुस्तीबद्दल बोलताना धोनीने सांगितले की, “वयस्कर होणे आणि तंदुरुस्त राहणे, या दोन अतिशय कठीण गोष्टी आहेत. जर तुम्ही खेळत असाल तर तुंम्हाला कोणी तंदुरुस्त नाही असे म्हटले नाही पाहिजे. त्यामुळे मला संघातील तरूण खेळांडूसमवेत चालावे लागणार आहे. परंतु ही अग्निपरीक्षाच असते.”
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईकरचा चेन्नईकर बनलेला जेसन बेहरनडॉर्फ, वाचा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील रोमांचक गोष्टी
कॅचमास्टर! केवळ जडेजाच नाही तर ‘या’ ६ क्रिकेटपटूंनीही आयपीएलमध्ये एका सामन्यात घेतलेत ४ झेल