---Advertisement---

कोण असेल धोनीचा उत्तराधिकारी आणि कोण घेणार हेजलवुडची जागा? ऐका सीएसके सीईओच्या तोंडून

On: सोमवार, एप्रिल 5, 2021 8:01 PM
---Advertisement---

येत्या ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या हंगामाचा शुभारंभ होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात या हंगामाची पहिली लढत रंगणार आहे. तत्पुर्वी तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या अडचणीत भर पडली आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड याने पूर्ण हंगामातून माघार घेतली आहे. दुसरीकडे संघनायक एमएस धोनी याच्यानंतर संघाचा उत्तराधिकारी कोण असेल? हा प्रश्न सर्वांचा सतावत आहे.

कोण घेणार कर्णधार धोनीची जागा?
माध्यमांतील वृत्तांनुसार, धोनीच्या अनुपस्थित चेन्नई संघाच्या नेतृत्त्वाची सुत्रे कोणाच्या हाती असतील?, यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबरोबरच संघाच्या उपकर्णधाराच्या नावाचीही घोषणा करण्यात येणार नाही. या प्रकरणांना प्राथमिकता न देता आयपीएल २०२१ दरम्यान याबाबतीत योग्य तो निर्णय घेतला जाईल.

हेजलवुडचा पर्याय शोधणे अद्याप प्रथामिकता नाही
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक पाहता हेजलवुडने आयपीएल २०२१ मधून माघार घेतली होती. त्याचा पर्याय म्हणून चेन्नईने काही खेळाडूंपुढे प्रस्ताव मांडला होता. परंतु त्यांनी या नकार दिल्याने चेन्नईने हेजलवुडच्या पर्यायासंबंधात कठोर निर्णय घेण्याचे ठरवले आहे.

इनसाइड स्पोर्टमधील वृत्तानुसार, चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले आहे की, “सध्या तरी आम्ही हेजलवुडच्या पर्यायाबाबत जास्त चितेंत नाहीत. संघ व्यवस्थापनाने काही खेळाडूंशी संपर्क साधला होता. परंतु कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता खेळाडूंनी प्रस्ताव नाकारला. त्यामुळे अद्याप आम्ही यासंदर्भात कसालाही निर्णय घेतलेला नाही. कारण ही आमची प्रथामिकता नाही. आमच्याकडे आधीपासूनच तगडा संघ आहे.”

उपकर्णधाराविना संघ उतरणार मैदानात
असे म्हटले जात आहे की, चेन्नईचा उपकर्णधार म्हणून सुरेश रैना किंवा रविंद्र जडेजा यांची निवड केली जाऊ शकते. परंतु संघाने हा निर्णय पुढे ढकलला असून यंदा चेन्नई संघ उपकर्णधाराशिवाय आयपीएल सामने खेळणार असल्याचे समजत आहे. चेन्नईचे सीईओ विश्वनाथन यांनी म्हटले आहे की, “संघाच्या उपकर्णधाराबद्दलचा निर्णय आम्ही संघ व्यवस्थापनावर सोडला आहे. ते आयपीएलच्या पुढील चरणात याबाबतीत निर्णय घेतील.”

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तानविरुद्धची वनडे मालिका अर्ध्यात सोडून ‘या’ संघाचे शिलेदार निघाले आयपीएल वारीला

सलग ४ हंगामात प्लेऑफ गाठलेल्या आयपीएलच्या ‘या’ संघाला का म्हटले जाते कंजूस आणि लूटेर्‍यांची टीम? वाचा कारण

IPL 2021: ‘रनमशिन’ कोहलीची नजर खास विश्वविक्रमावर, आजपर्यंत कोणालाच नाही जमला नाहीये ‘तो’ पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---