भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये अजूनही खेळत आहे. आगामी आयपीएल हंगामाल काही महिन्यांवर आला आहे. अशात धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या तयारीला सुरुवात झाल्याचे दिसते. स्वतः कर्णधार धोनीने आगामी आयपीएल हंगामासाठी स्वतःला तयार करत असल्याचे दिसते. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनीबाबत महत्वाची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली.
एमएस धोनी (MS Dhoni) आणि भारतीय संघ (Team India) ही जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी ठरली. धोनीच्या नेतृत्वात भारताने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. तसेच चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super kings) जिंकलेल्या पाचही आयपीएल ट्रॉफी धोनीच्याच नेतृत्वातील आहेत. अनेकांच्या मते आयपीएल 2024 (IPL 2024) हा धोनीसाठी शेवटचा आयपीएल हंगाम असणार आहे. असे असले तरी, स्वतः धोनी किंवा सीएसकेकडून अद्याप याविषयी कुठलीच ठोस माहिती समोर आली नाहीये. काही दिवसांपूर्वी धोनीच्या गुडघ्या गुडघ्याच्या दुखापतीबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या होत्या. अशात आगमी हंगामात धोनी खेळणार की नाही, याबाबतही संशय व्यक्त केला जात होता.
सीएसकेचे सीईओ स्वतः देखील धोनीच्या फिटनेसवर लक्ष ठेऊन असल्याचे पाहायला मिळते. त्यांनी कर्णधाराच्या फिटनेसबाबत सांगितले की, “गुडघ्याच्य दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने जिममध्ये यायला सुरुवात केली आहे. पुढचे 10 दिवसात धोनी मैदानातही सरावाला सुरुवात करेल.” यावेळी काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या निवृत्तीबाबत देखील प्रश्न विचारला गेला. पण सीईओ यांनी याबाबत सांगता येणार नाही, असेच म्हटले. “धोनी आम्हाला काहीच सांगत नाही. त्याला जो निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय तो स्वतःच घेईल,” असे काशी विश्वनाथन म्हणाले. (CSK CEO Kashi Viswanathan gave an update on Dhoni’s fitness and preparations for IPL 2024)
आयपीएल 2024 साठी चेन्नई सुपर किंग्ज संघ –
अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चाहर, डेवोन कॉनवे, महेश थीक्षाना, मथीशा पथिराना, मिचेल सेंटनर, मोइन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, रुतुराज गायकवाड़ , शेख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे.
महत्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! आयपीएल 2024 मधून हार्दिक घेणार माघार? जाणून घ्या कारण
दीप्ती-पूजाच्या नावावर मोठा विक्रम, फिनिशर म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली खेळी नेहमी उल्लेखली जाणार