---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्सकडून एमएस धोनी करणार या क्रमांकावर फलंदाजी

On: गुरूवार, मार्च 21, 2019 6:56 PM
---Advertisement---

आयपीएलच्या १२ व्या मोसमाला शनिवारी, २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मोसमातील पहिला सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे.

या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी एमएस धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल असे संकेत दिले आहेत. धोनीने कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवे यावर मागील अनेक महिन्यांपासून विविध मतप्रवाह अनेक क्रिकेट तज्ञांनी मांडले आहेत.

पण यावेळी स्टिफन यांनी धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येणार असल्याचे मात्र स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, ‘ मागीलवर्षी धोनीने चौथ्या क्रमांकावर बऱ्याचदा फलंदाजी केली आहे. पण आम्ही त्याचा क्रमांक हलवता ठेवला होता. यावेळीही ते बदलणार नाही. तो मागील १० महिन्यांपासून चांगल्या लयीत आहे. त्याचबरोबर आमच्याकडे केदार जाधव हा खेळाडू देखील आहे. जे चांगले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या फलंदाजी क्रमवारीबाबद आनंदी आहोत.’

त्याचबरोबर अन्य संघाच्या तुलनेत चेन्नईच्या बाबतीत बोलताना स्टिफन म्हणाले, ‘आम्ही तुलना करत नाही. कारण जर तूम्ही दुसऱ्या संघांकडे बघायला जाल तर तूम्ही तूमच्याकडे स्वत: च्या चांगल्या किंवा वाईट गोष्टीपासून दूर जाल. प्रत्येक संघाकडे दिग्गज क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे मानसिकता, संघातील वातावरण, संस्कृती आणि मोठ्या क्षणांना जिंकण्यावर यश अवलंबून आहे.

‘मागीलवर्षी आम्ही मोठे क्षणही जिंकले. आम्ही संघ संस्कृती जपली आणि आम्ही खेळाडूंना निर्णय घेण्यासाठी आणि जिंकण्यासाठी सशक्त केले.’

चेन्नई संघाने आत्तापर्यंत आयपीएलचे तीन वेळा विजेतेपद मिळवले आहे. त्यांनी ही विजेतपद २०१०,२०११ आणि २०१८ या मोसमात मिळवली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय क्रिकेटपटूंनी अशा दिल्या होळीच्या शुभेच्छा…

आयपीएल सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सला बसला मोठा धक्का

यावर्षीच आयपीएल पहिल्यांदाच खेळणारे हे ५ प्रतिभावान खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment