शुक्रवार (16 एप्रिल) रोजी एमएस धोनीने आपल्या नावावर एक मोठा विक्रम केला आहे. जेव्हा त्याने पंजाब किंग्ज विरुद्ध सामना खेळण्याकरिता मैदानात प्रवेश केला, तेव्हा चेन्नई सुपर किंग्जकडून 200 सामने खेळणारा तो पहिला क्रिकेटपटू बनला. त्यावेळी संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि या संघातील माजी खेळाडू शेन वॉटसन यांनी त्याचे कौतुक करत धोनीला चेन्नई सुपर किंग्जच्या ‘काळजाचा ठोका’ म्हटले आहे.
धोनी हा 2008 पासून चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असून त्याने या संघामधून 200 पैकी 199 सामन्यात चेन्नई संघाचे नेतृत्व केले आहे. 2012 मधील एका चॅम्पियन्स लीगमधील सामन्यात तो कर्णधार नव्हता.
चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जवर सहा गडी राखून विजय मिळवल्यानंतर संघाचे प्रशिक्षक फ्लेमिंग म्हणाले की, “धोनीची कारकीर्द खूप मोठी आहे. याबद्दल त्याचे कौतुक केले पाहिजे. 200 सामने खेळल्यानंतरही त्याचा खेळाबद्दलचा आणि संघाबद्दलचा दृष्टीकोन खरोखरच कौतुकास्पद आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “दरम्यानच्या काळात हा संघ विकसित झाला असून त्यासोबत धोनीदेखील मोठा झाला आहे असे मला वाटते. परंतु हे एक उत्तम नाते असून एक मजेदार गोष्टही आहे.”
तसेच पुढे धोनीला सीएसके संघाच्या ‘हृद्याचा ठोका’ संबोधताना म्हणाले की, “तो चेन्नई सुपर किंग्जची धडकन आहे यात काहीच शंका नाही. मग ते त्यांचे प्रदर्शन, सूचना किंवा कर्णधारपदाची कामगिरी असो. त्याच्याबद्दल बोलण्यासाठी तर आपल्याकडे शब्द सुद्धा नाहीत.”
https://twitter.com/ShaneRWatson33/status/1383042415242584066?s=20
तसेच सामन्यापुर्वी या खास कामगिरीसाठी वॉटसनने ट्विटरवर धोनीचे अभिनंदन केले होते. त्याने ट्विट करताना त्यामध्ये, ‘चेन्नई सुपर किंग्जकडून 200 सामने खेळायला बेस्ट ऑफ लक एमएस. आपण संघाची धडकन आहात आणि सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहात.’ असे लिहले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘यॉर्कर किंग’ नटराजनला का मिळाली नाही बीसीसीआयच्या वार्षिक करार यादीत जागा? जाणून घ्या कारण
बुमराह-बोल्ट नव्हे राहुल चहर मुंबईचा ‘विकेट टेकर’ गोलंदाज; प्रशिक्षकाने उधळली स्तुतिसुमने





