भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. २०१३ मध्ये मुंबई इंडियन्स संघांमध्ये पदार्पण करणाऱ्या जसप्रीत बुमराहने आपल्या आगळ्या वेगळ्या गोलंदाजी ॲक्शनने सर्वांना वेड लावून सोडले होते. अजूनही असे खूप लोक आहेत, जे जसप्रीत बुमराह सारखी हुबेहूब गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक व्हिडिओ मुंबई इंडियन्स संघाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे.
जसप्रीत बुमराह सध्या मुंबई इंडियन्स संघासाठी आयपीएल खेळण्यात व्यस्त आहे. अशातच मुंबई इंडियन्स संघाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोन क्रिकेट चाहते जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीच्या ॲक्शनमुळे भांडण करताना दिसून येत आहेत. दोघेही एकमेकांना जसप्रीत बुमराहची गोलंदाजी ॲक्शन शिकवताना दिसून येत आहेत.
यांच्या मध्येच जसप्रीत बुमराह येतो आणि म्हणतो की, “तुम्हीच शिकवा, कसा हाथ फिरवायचा. तुम्ही शिकवा मला..” हे ऐकून एकटा म्हणतो की, “आम्हाला येत नाही”; तर दुसरा म्हणतो की, “मी तर यष्टीरक्षक आहे” आणि दोघे ही पळ काढतात. या व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.
येथे पाहा व्हिडिओ:
https://www.instagram.com/reel/CNkFjxnDcJr/?igshid=nlefp8sh66nd
आयपीएल २०२१ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. पहिला सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने मुंबई इंडियन्स संघाला पराभूत केले होते. तर दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने पुनरागमन करत कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत केले होते. या दोन सामन्यात जसप्रीत बुमराहला अवघे २ गडी बाद करण्यात यश आले आहे. त्यामुळे येणाऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL: ‘यांच्या’पुढे धाव घेणं म्हणजे मोठी जोखीम; सर्वाधिक फलंदाजांना धावबाद करणारे क्षेत्ररक्षक
‘यॉर्कर किंग’ नटराजनला का मिळाली नाही बीसीसीआयच्या वार्षिक करार यादीत जागा? जाणून घ्या कारण
बुमराह-बोल्ट नव्हे राहुल चहर मुंबईचा ‘विकेट टेकर’ गोलंदाज; प्रशिक्षकाने उधळली स्तुतिसुमने






