मुंबई। चेन्नई सुपर किंग्सने मंगळवारी (१२ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात २२ व्या सामन्यात २३ धावांनी पराभूत केले. याबरोबरच चेन्नईने आयपीएलच्या १५ व्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला. डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स् ऍकेडमी येथे पार पडलेला हा सामना चेन्नईसाठी खास ठरला आहे.
चेन्नईने मुंबईची केली बरोबरी
चेन्नईचा हा आयपीएलमधील २०० वा सामना होता. त्यामुळे चेन्नई (Chennai Super Kings) आयपीएलमध्ये असा कारनामा करणारा सहावा संघ ठरला. चेन्नईने त्यांचा २०० वा सामना विजय मिळवत आणखी खास बनवला आहे. याबरोबरच मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) एका विक्रमाशी बरोबरी देखील केली आहे.
मंगळवारी मिळवलेला विजय हा चेन्नईचा आयपीएलमधील ११८ वा विजय देखील ठरला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये २०० सामने पूर्ण केल्यानंतर सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघामध्ये चेन्नईने मुंबईची बरोबरी केली आहे. मुंबईने देखील २०० सामने पूर्ण केले, तेव्हा ११८ विजय मिळवले होते. या यादीत चेन्नई-मुंबई पाठोपाठ कोलकाता नाईट रायडर्स संघ आहे. कोलकाताने २०० व्या आयपीएल सामन्यावेळी १०२ विजय मिळवले होते (Most Wins after 200 IPL matches).
चेन्नईने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २०० सामन्यांमध्ये ११८ विजय मिळवण्याबरोबरच ८० सामन्यात पराभव पत्करला आहे. त्याचबरोबर एका बरोबरी झालेल्या सामन्यात पराभव पत्करला आहे आणि एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.
आयपीएलमध्ये २०० सामन्यांनंतर सर्वाधिक विजय मिळवणारे संघ
११८ विजय – चेन्नई सुपर किंग्स
११८ विजय – मुंबई इंडियन्स
१०२ विजय – कोलकाता नाईट रायडर्स
९५ विजय – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
९२ विजय – सनरायझर्स हैदराबाद
९० विजय – दिल्ली कॅपिटल्स
चेन्नईचा पहिला विजय
आयपीएल २०२२ हंगामात (IPL 2022) चेन्नईने पहिल्या चार सामन्यात पराभव पत्करला होता. पण पाचव्या सामन्यात त्यांनी दमदार पुनरागमन करत सामना आपल्या नावावर केला. याबरोबर २ गुणही मिळवले. या सामन्यान चेन्नईने रॉबिन उथप्पा (८८) आणि शिवम दुबे (९५) यांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ४ बाद २१६ धावा केल्या होत्या. तसेच २१७ धावांचा पाठलाग करताना बेंगलोरला २० षटकांत ९ बाद १९३ धावाच करता आल्या. हा रविंद्र जडेजाचा चेन्नईचा कर्णधार म्हणून पहिलाच विजय ठरला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
रायुडूची ३६व्या वर्षी चित्त्यासारखी चपळाई, आरसीबीच्या फलंदाजाला एकहाती झेल घेत धाडलं तंबूत
Video: टी२०मध्ये आपला ‘बनी’ बनलेल्या मॅक्सवेलला बाद करताच जडेजाचे ‘गन सेलिब्रेशन’ व्हायरल
बेंगलोरने सामना गमावला, पण विराटने जिंकली सर्वांची मने; संघर्ष करणाऱ्या ऋतुराजला केले प्रेरित