---Advertisement---

चेन्नईच्या शिलेदाराने केला गुपचूप साखरपुडा; पण मित्राला बोलावून फसला आणि फोटो मीडियात पोहोचला

On: सोमवार, जून 12, 2023 10:51 PM
CSK
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघ विजेता ठरला. सीएसकेला आयपीएलची पाचवी ट्रॉफी मिळवून देण्यासाठी त्यांचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याचे योगदान महत्वाचे राहिले. सीएसकेला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर तुषार देशपांडे याने साखरपुडा उरकला आहे. सोमवरी (12 जून) तुषारच्या साखरपुड्याची माहिती समोर आली. 

आयपीएलमध्ये तुषार देशपांडे (Tushar Deshpande) याचा सहकारी असलेल्या शिवम दुबेच्या सोशल मीडियावरून वेगवान गोलंदाजांच्या लग्नाची माहिती समोर आली. शिवम दुबेच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून तुषारच्या लग्नाची स्टोरी शेअर केली गेली. फोटोत शिबम दुबे आणि त्याची पत्नी अंजूम खान जोडप्यासोबत दिसत आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अभिनंदन तुषार आणि नभा (गड्डमवार).”

Tushar Deshpande Wedding
Photo Courtesy: Instagram/Screengrab/shivam dube

दरम्यान, सोशल मीडियावर सीएसकेचे चाहते वेगवान गोलंदाज तुषारला साखरपुड्याच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. तुषारचे नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2023 मधील प्रदर्शनाचा विचार केला, तर पर्पल कॅपच्या शर्यतीत तो सहाव्या क्रमांकावर होता. संपूर्ण हंगामात त्याने सीएसकेसाठी 16 सामने खेळले आणि यात एकूण 21 विकेट्स घेतल्या. सीएसकेसाठी त्याने हंगामात सर्वाधिक 564 धावा खर्च केल्या असल्या, तरी संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज देखील तोच राहिला. आयपीएल 2023 मध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 9.92 होता, तर सरासरी 26.85 राहिली होती. 45 धावा खर्च करून तीन विकेट्स हे त्याचे हंगामातील सर्वोत्तम प्रदर्शन राहिले आहे.

तुषारच्या एकंदरीत आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने एकूण 23 सामने या लीगमध्ये खेळले आहेत आणि एकूण 25 विकेट्स गेतल्या आहेत. म्हणजे मागच्या हंगामा त्याने अवघ्या 4 विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट तब्बल 10.13चा असून सरासरी 32.46 राहिली आहे. यावर्षीच्या हंगामातील त्याचे प्रदर्शन मागच्या वर्षीपेक्षा सुधारल्याचे दिसले. चाहत्यांना अशा अपेक्षा आहेत की एमएस धोनीच्या नेतृत्वात आयपीएल 2024मध्ये तो आपल्या आकडेवारीत अजून सुधारणा करेल.

दरम्यान, सीएसकेचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड नुकताच जूनच्या पहिल्या आढवड्यात लग्नबंधनात अडकला. ऋतुराजने क्रिकेटपटू उत्कर्षा पवार हिच्यासोबत आयुष्यातील नव्या इनिंगची सुरुवात केली. अशात काहीच दिवसांच्या अंतराने तुषारनेही लग्न केले. (CSK fast bowler Tushar Deshpande got married)

महत्वाच्या बातम्या –
LPL 2023 च्या लिलावात सुरैश रैनाही सामील! ‘ही’ आहे भारतीय दिग्गजाची बेस प्राईसे 
नवरा बायकोकडे आहेत आयसीसीच्या 11 ट्रॉफी, पाहा मिचेल स्टार्क- एलिसा हेलीचा पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---