---Advertisement---

IPL 2019मध्ये धोनीच्या मैदानावरील जाण्याविषयी माजी सहकाऱ्याची प्रतिक्रिया, म्हणाला, ‘त्याला पश्चाताप…’

MS-Dhoni-IPL-2019
---Advertisement---

महेंद्र सिंग धोनी हा इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाला चार वेळा आयपीएलचा किताब जिंकून दिला आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2020मध्ये निवृत्त झाला. मात्र, जेव्हा तो भारतीय संघाचे नेतृत्व किंवा प्रतिनिधित्व करायचा, तेव्हा तो त्याच्या मैदानावर शांत स्वभावासाठी ओळखला जायचा. आयपीएलमध्येही धोनी नेहमीच शांत दिसतो. मात्र, आयपीएल 2019 हंगामात धोनीबाबत एक अशी घटना घडली होती, जी पाहून क्रिकेटविश्व हादरलं होतं. त्यावर चेन्नईचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. चला त्याबाबत जाणून घेऊयात…

झाले असे की, आयपीएल 2019 (IPL 2019) हंगामादरम्यान एक अशी घटना घडली होती, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. या हंगामात राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघातील एका सामन्यात एमएस धोनी (MS Dhoni) याचे वेगळेच रूप पाहायला मिळाले होते. पंचांच्या निर्णयामुळे नाराज झालेला धोनी डगआऊटमधून उठून थेट मैदानात आला होता. तसेच, त्याने पंचांशी बाचाबाची केली होती. आता या घटनेची आठवण काढत चेन्नईचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. उथप्पाने सांगितले की, धोनीला त्या गोष्टीचा पश्चाताप होत होता आणि तो हेच म्हणत होता की, मैदानात गेलो नव्हतो पाहिजे.

https://twitter.com/ShuhidAufridi/status/1651427869925740544

खरं तर, आयपीएल 2019चा तो सामना खूपच रोमांचक स्थितीत पोहोचला होता. चेन्नई संघ धावांचा पाठलाग करत होता. त्यांना 3 चेंडूत 8 धावांची गरज होती. त्यावेळी गोलंदाजी करत असलेल्या बेन स्टोक्स याने कमरेच्या वर फुलटॉस चेंडू टाकला. पंचांनी या चेंडूला नो-बॉल देण्याचा विचार केला, पण हात वर नेताच, दुसऱ्या बाजूला असलेल्या पंचांनी निर्णय बदलला. त्यांनी हा नो-बॉल दिला नाही. त्यामुळे धोनी नाराज झाला होता आणि रागारागात डगआऊटमधून उठून मैदानात आला होता. तसेच, पंचांशी वाद घातला होता. यावेळी प्रत्येकजण हैराण झाला होता की, नेहमीच शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा धोनी असे कसे करू शकतो.

‘धोनीला त्या गोष्टीचा पश्चाताप’
आयपीएल 2023 (IPL 2023) सामन्यात राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात सामना खेळला जात होता, तेव्हाच रॉबिन उथप्पा याने त्या घटनेची आठवण केली. त्याने यावेळी जिओ सिनेमावर बोलताना म्हटले की, “मी धोनीसोबत याविषयी चर्चा केली होती. तो मला म्हणाला की, मी खूपच उदास होतो आणि मैदानात गेलो. मी पाहिले की, जो मुख्य पंच आहे, तो नो-बॉल देण्यासाठी हात वर करत होता. स्ट्रेट पंचच खेळ नियंत्रित करतो. एकदा जेव्हा तुम्ही नो-बॉल दिला, तर तो कुणीही बदलू शकत नाही. त्यानंतर रागारागात तो मैदानात गेला होता. धोनीला याचा पश्चाताप होता. तो मला म्हणाला की, मी आत जायला नको होते. मी त्याच्या मागे बसलो होतो आणि विचार करू लागलो की, तो कुठे जात आहे. मी त्याला असे कधीच पाहिले नव्हते.”

राजस्थान विरुद्ध चेन्नई सामन्याविषयी बोलायचं झालं, तर राजस्थानने उभारलेल्या 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने फक्त 170 धावाच केल्या. त्यामुळे राजस्थानने हा सामना 32 धावांनी जिंकला. हा राजस्थानचा चेन्नईविरुद्धचा हंगामातील सलग दुसरा विजय होता. (csk former cricketer robin uthappa opens up on ms dhoni s infamous act against rajasthan royals in ipl 2019)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफलातून! 21 वर्षीय जयसवालच्या खणखणीत षटकारामुळे CSKच्या चीअरलीडर्समध्ये खळबळ, पाहा व्हिडिओ
जयसवालला ‘यशस्वी’ होण्यापासून रोखण्यात ‘धोनी रिव्ह्यू सिस्टम’ही फेल, ‘इतक्या’ चेंडूत ठोकली फिफ्टी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---