Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्यामुळे धोनी 41व्या वर्षीही फिट! 20 वर्षांपूर्वी घ्यायचा ‘हा’ डायट, रॉबिन उथप्पाचा खुलासा

त्यामुळे धोनी 41व्या वर्षीही फिट! 20 वर्षांपूर्वी घ्यायचा 'हा' डायट, रॉबिन उथप्पाचा खुलासा

March 19, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/@robbieuthappa

Photo Courtesy: Twitter/@robbieuthappa


भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी नेहमीच चर्चेत असतो. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी चाहत्यांमधील त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या धोनी आयपीएल 2023 साठी तयारी करत आहे. धोनी स्वतः कधीच माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जास्त बोलताना दिसला नाहीये. पण त्याचे सहकारी खेळाडू नेहमीच त्याच्याविषयी वेगवेगळे खुलासे करत आले आहेत. अशातच आता भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पा याने धोनीच्या फिटनेसमागचे गुपित चाहत्यांसमोर आणले.

रॉबिन उथप्पा (Robin uthappa) आणि एमएस धोनी (MS Dhoni) जवळपास मागच्या दोन दशकांपासून एकमेकांना ओळखतात. धोनीच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते तो एक दिग्गज बनेपर्यंतचा प्रवास उथप्पाने जवळून पाहिला आहे. याच पार्श्वभूमीवर जिओ सिनेमावर बोलताना उथप्पाला धोनीविषयी अनेक प्रश्न विचारले गेले. याचदरम्यान उथप्पाने धोनीची शिस्त आणि डायटविषयी महत्वाची माहिती दिली. “धोनीचा साधेपणा ही अशी गोष्ट आहे, जी कधीच बदलली नाही. तो आजही तसाच आहे, जसा सुरुवातीच्या दिवसांमध्ये होता. धोनी जगातील सर्वात सरळ स्वभावाचा व्यक्ती आहे,” असेही उथप्पाने यावेळी सांगितले.

धोनीच्या डायविषयी उथप्पा म्हणाला, “तो आमच्यासोबत जेवण करायचा. आमचा ग्रुप होता, सुरेश रैना, इरफान पठाण, आरपी सिंग, पियुष चावला, मुनाफ पटेल आणि धोनी. आम्ही दाल मखनी, बटर चिकन, जीरा आलू गोभी आणि रोटी मागवायचो. पण एमएस कडक शिस्तिचा होता. बटर चिकन खाताना तो कधीच चिकन खात नसे, फक्त ग्रेवी खायचा. जेव्हा तो चिकन खायचा, तेव्हा कधीच रोटी खात नसायचा.” इथप्पाने सांगितलेल्या या किस्स्यावरून धोनी आधीपासूनच आपल्या फिटनेविषयी किती काळजी घेणारा होता, हे लक्षात येते.

दरम्यान, धोनीला अनेकदा भारतीय संघाला मिळालेला आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार म्हणून ओळखले जाते. त्याच्या नेतृत्वात भारताने टी-20 आणि वनडे विश्वचषकासह एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारताला तीन आयसीसी ट्रॉफी मिळवून देणारा धोनी हा एकमेव कर्णधार ठरला. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आणि या स्पर्धेतील दुसरा सर्वात यशस्वी संघ ठरला. यावर्षी धोनी आपला शेवटचा आयपीएल हंगाम खेळण्याची शक्यता आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे…’, भारतीय खेळपट्टीला नावे ठेवणाऱ्यांना सचिनचे सडेतोड उत्तर
दिवंगत आईसाठी कमिन्सने केली भावूक पोस्ट! लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत लिहीले…


Next Post
Virat-Kohli-Test-1

'फॅब फोर'च्या यादीत विराटची घसरण सुरूच, विलियम्सन भारतीय दिग्गजाला मागे टाकण्याच्या तयारीत

Virat-Kohli-Statement

विराटचा येणार बायोपिक? 'या' साऊथ सुपरस्टारने व्यक्त केली मुख्य भूमिका निभावण्याची इच्छा

matt dunn

दुःखद बातमी: इंग्लिश क्रिकेटपटूच्या चिमुकलीला देवाज्ञा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143