ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याची आई मारियाचे निधन 9 मार्च रोजी झाले होते. आईच्या खराब तब्येतीमुळे कमिन्स भारत दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला होता. आपल्या आईचे अखेरचे काही दिवस सोबत घालवल्यानंतर आता कमिन्सने आपल्या आईच्या आठवणीत एक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे.
कमिन्सने शनिवारी (19 मार्च) एक इंस्टाग्राम पोस्ट करताना सात छायाचित्रे शेअर केली. यामध्ये कमिन्स आपल्या आईसोबत दिसतोय. विशेष म्हणजे ही सर्व छायाचित्रे त्याच्या लहानपणापासून त्याच्या लग्नापर्यंतची आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले. ‘आई मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू नेहमीच माझ्या हृदयात राहशील.’
पॅट कमिन्स (Pat Cummins) याची आई मारिया मागच्या मोठ्या काळापासून ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होती. पण अखेर शुक्रवारी (10 मार्च) दिवस उगवण्याच्या आधी तिची प्राणज्योत मावळली. आईची तब्येत गंभीर असल्यामुळेच कमिन्स बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023च्या दुसऱ्या सामन्यानंतर मायदेशात परतलेला. आईची तब्येत सुधारत नसल्याने कमिन्से सुरुवातील तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली. त्यानंतर चौथ्या कसोटीसाठीही त्याला उपस्थित राहता आले नाही. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चौथ्या कसोटीत दंडाला काळीपट्टी बांधून त्याच्या आईला श्रद्धांजली अर्पण केली होती. यानंतर कमिन्सने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून देखील माघार घेत आपल्या कुटुंबासह राहण्याचा निर्णय घेतलेला.
कमिन्स याच्यासाठी भारत दौरा तितका चांगला राहिला नव्हता. गोलंदाज म्हणून देखील दोन सामन्यात तो केवळ तीन बळी मिळवण्यात यशस्वी ठरलेला. तर, त्याच्या नेतृत्वात संघाला दोन्ही कसोटी सामने गमवावे लागले होते. त्यानंतर नेतृत्व स्वीकारलेल्या स्टिव्ह स्मिथ याने संघाला एक विजय मिळवून दिला. तसेच, चौथा सामना देखील अनिर्णित राखण्यात यश मिळवले होते.
(Australia Captain Pat Cummins Instagram Post For His Late Mother)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका पराभवाने खचला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर; म्हणाला, ‘आम्ही राहुलसारखी फलंदाजी…’
ब्रेकिंग! विराटच्या RCBची ताकद वाढली, भारताविरुद्ध 140 धावा चोपणारा ‘हा’ खेळाडू ताफ्यात सामील