गुरुवारी (१२ मे) आयपीएलच्या मैदानात मुंबईच्या गोलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्जची चांगलीच दाणादाण उडवली. मुंबईच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे सीएसकेला डावातील संपूर्ण २० षटके देखील खेळून काढता आली नाहीत. सीएसकेने पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये पाच महत्वाच्या विकेट्स गमावल्या. दरम्यान, मुंबई इंडियन्ससमोर सीएसकेची अशाप्रकारे दुर्दशा होण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वी देखील सीएसकेला अशा सामन्यांना सामोरे जावे लागले होते.
मुंबई इंडियन्सच्या अप्रतिम गोलंदाजी प्रदर्शनामुळे सीएसकेचा संघ अवघ्या ९७ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात सीएसकेने पॉवरप्लेच्या षटकांमध्ये त्यांच्या पाच महत्वाच्या विकेट्स गमावल्या. यामध्ये डेवॉन कॉनवे, मोईन अली, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू यांचा समावेश होता. दरम्यान, ही पहिली वेळ नाही, जेव्हा सीएसकेने पॉवरप्लेमध्ये पाच विकेट्स गमावल्या आहेत. यापूर्वीही दोन वेळा सीएसकेने अशाप्रकारे चाहत्यांची निराशा केली होती. विशेष बाब म्हणजे यापूर्वी दोन वेळा देखील मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळतानाच सीएसकेची अशी दुर्दशा झाली होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएल २०२०मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सीएसकेने पॉवरप्लेमध्ये २४ धावा करून ५ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर आयपीएल २०२१मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध पुन्हा एकदा सीएसकेने पॉवरप्लेमध्ये ५ विकेट्स गमावल्या होत्या. यावेळीही सीएसकेने अवघ्या २५ धावा करून ५ विकेट्स गमावल्या होत्या. आता ही तिसरी वेळ आहे, जेव्हा सीएसकेने पॉवरप्लेमध्ये ५ विकेट्स गमावल्या आहेत आणि यावेळी देखील त्यांच्या समोर मुंबईचेच आव्हान आहे. गुरुवारी मुंबईविरुद्धच्या सामन्यात सीएसकेने ३५ धावा करून पॉवरप्ले संपण्याच्या आधीच ५ विकेट्स गमावल्या.
पॉवरप्लेमध्ये सीएसकेने तीन वेळा गमावल्या आहेत ५ विकेट्स
२४/५ विरुद्ध मुंबई इंडियन्स (आयपीएल २०२०)
२४/५ विरुद्ध मुंबई इंडियन्स (आयपीएल २०२१)
३२/५ विरुद्ध मुंबई इंडियन्स (आयपीएल २०२२)*
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर सीएसकेचा संपूर्ण संघ अवघ्या १६ षटकांमध्ये गुंडाळला गेला. मुंबईच्या डॅनियल सॅम्सने १६ धावा खर्च करून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर सीएसकेसाठी कर्णधार एमएस धोनीने सर्वात मोठी ३६ धावांची खेळी केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काउंटी क्रिकेटमध्ये दिसला ‘डुप्लिकेट’ शेन वॉर्न; जबराट फिरकीने उडवल्या फलंदाजाच्या दांड्या
एक तीर, तीन निशाणे! वॉर्नरने झटक्यात विराट, डिविलियर्स अन् गेलला टाकले मागे, पाहा पठ्ठ्याचा कारनामा