इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला असून बुधवार रोजी (१३ ऑक्टोबर) या हंगामातील अंतिम फेरीत धडक मारणारा दुसरा संघ कोणता हे कळेल. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल. तत्पूर्वी पहिला क्वालिफायर जिंकत चेन्नई सुपर किंग्ज संघाने सर्वात आधी अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे.
चेन्नई संघाच्या या दमदार यशानंतर त्यांच्या ताफ्यात सध्या आनंदाचे वारे वाहत आहे. अगदी खेळाडूंपासून ते त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यात खेळाडूंची चिमुकली मुलेही मस्ती करताना दिसली आहेत.
चेन्नई संघाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर अकाउंटवर त्यांचा मस्ती करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसते की, चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीची मुलगी झिवा धोनी ही रॅम्प वॉक करते आहे. तिच्याबरोबरच ‘चिन्ना थाला’ म्हणून आयपीएलप्रेमींमध्ये प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनाची मुलगी ग्रेसिया रैना ही सुद्धा रॅम्प वॉकचा आनंद लुटते आहे. त्यांच्या या क्यूट रॅम्प वॉकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अनेकांनी त्यांना प्रोफेशनल मॉडेल असेही म्हटले आहे.
तर रैनाचा मुलगा रियो रैना त्याच्या इवल्या इवल्या पाऊलांनी चालत सर्वांचे लक्ष वेधतो आहे. त्यांच्यासोबत रॉबिन उथप्पा मुलगा, चेतेश्वर पुजाराची मुलगी आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांच्या मुलींनीही या क्षणाचा भरपूर आनंद घेतला आहे.
रॅम्प वॉक करण्याव्यतिरिक्त त्यांनी वाळूने घर बनवणे, झोका खेळणे असे इथरही खेळ खेळले आहेत. अगदी त्यांच्यासोबत क्रिकेटपटू आणि त्यांच्या पत्नीही सहभागी होईन मस्ती करताना दिसत आहेत. चेन्नई संघाने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतो आहे.
????uteness ????nlimited ????eyond the ????ky ????
Awwdorable Max! ????#SuperFam #WhistlePodu #Yellove ???? pic.twitter.com/0Ye8wyggcQ— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 12, 2021
चेन्नई संघाने १० ऑक्टोबर रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात ४ विकेट्सने बाजी मारली. हा सामना जिंकत सरळ अंतिम सामन्यातील आपली जागा पक्की केली आहे. तर पराभूत झालेला दिल्लीचा संघ पुन्हा एकदा एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाशी भिडणार आहे. हा सामना जिंकणारा संघ चेन्नई संघासोबत अंतिम सामना खेळेल.
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! शार्दुल ठाकूरची टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियात निवड, ‘या’ खेळाडूऐवजी मिळाले स्थान
केकेआरला सात वर्षांनंतर जिंकायचीय ट्रॉफी; मात्र, सेनापतीच्या बॅटला लागलाय गंज




