आयपीएल 2020चा (IPL 2020) 13वा हंगाम जवळ आला आहे. या हंगामासाठी सोमवारपासून(2 मार्च) चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) सरावाला सुरुवात केली आहे.
तसेच धोनीने त्याला एक चांगला खेळाडू बनण्याचे श्रेय चेन्नई संघाला दिले आहे. ‘मला एक चांगला खेळाडू बनवण्यामागे आणि माझ्यात मैदानावर तसेच मैदानाबाहेर कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठीचे बळ येण्यामागचे श्रेय माझ्या फ्रंचाईजीला जाते,’ असे त्याने स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये बोलताना म्हटले आहे.
जुलै 2019च्या वनडे विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यानंतर धोनीने एकही सामना खेळलेला नाही. यानंतर जवळजवळ 8 महिन्यांनी धोनी आयपीएलच्या सराव सत्रात उतरला. त्यावेळी त्याचे जोरदार स्वागत झाले. याचबरोबर धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी स्टेडियममध्ये पहायला मिळाली.
धोनीने सांगितले की, “सीएसकेने मला प्रत्येक गोष्टीत सुधारणा करण्यासाठी मदत केली आहे. मग तो माझा एक व्यक्ती म्हणून स्वभाव असो किंवा एका क्रिकेटपटू म्हणून स्वभाव असो. तसेच मैदानावरती आणि मैदानाबाहेरच्या कठीण प्रसंगाना सामोरे जात चांगली कामगिरी करत राहणे, याचबरोबर विनम्र राहणे या सर्व गोष्टी मला येथे शिकायला मिळाल्या.”
सीएसकेचे चाहते धोनीला प्रेमाने थाला म्हणतात. यावर धोनीने सांगितले की, “त्याला संघामुळे जेवढे प्रेम आणि सन्मान मिळाला तो विशेष आहे. मुळात ‘थाला’चा अर्थ ‘भाऊ’ असा आहे. चाहत्यांचे माझ्यावरील जे प्रेम आहे, ते यातून दिसून येते. मी आताही जेव्हा चेन्नई किंवा दक्षिण भारतात जातो तेव्हा तेथील लोक मला कधीच माझे नाव घेऊन बोलत नाहीत. ते मला थालाच म्हणतात. यावरून माझ्याप्रती त्यांचे प्रेम आणि आदर दिसून येतो. तसेच ते सीएसकेचे मोठे चाहते आहेत हेही दिसून येते.” असेही धोनीने पुढे सांगितले.
यावर्षीच्या आयपीएल 2020 मध्ये 29 मार्चला वानखेडे येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पहिला सामना पार पडणार आहे. या सामन्यातून धोनी जवळजवळ 8 महिन्यांनी क्रिकेट सामना खेळताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–उद्या होणाऱ्या भारत-इंग्लंड टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्याबद्दल सर्वकाही…
–न्यूझीलंड विरुद्ध संधी न मिळालेला हा खेळडू आता उतरणार रणजीच्या फायनलमध्ये
–निवडकर्त्यांच्या शर्यतीत भारताचा वेंकटेश प्रसाद आणि हे खेळाडू…