मुंबईतील वानखेडे मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात आयपीएल २०२२ म्हणजेच आयपीएलच्या १५व्या हंगामातील पहिला सामना रंगला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या सीएसके संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. मात्र, संघ अडचणीत असताना मैदानावर चेन्नई संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी उतरला. आणि धोनीने संघाचा ‘संकटमोचक’ ही भुमिका चोखपणे पार पाडली. (CSK MS Dhoni Scored Fifty In IPL 2022 First Match Against KKR )
चेन्नई संघाची अवस्था ८४ धावांवर ५ बाद अशी असताना एमएस धोनी (MS Dhoni) मैदानावर फलंदाजीस उतरला. त्यावेळी चाहत्यांनी त्याचे अतिशय जोरदार स्वागत केले. पुढे धोनीनेही चाहत्यांची निराशा न करता संघाचा विश्वास सार्थ ठरवला. आणि पुढील अवघ्या ३८ चेंडूत ५० धावा चोपत स्वतःचे शानदार अर्धशतक साजरे केले. (MS Dhoni Smashes Fifty) धोनीच्या वादळी अर्धशतकीय खेळीमुळेच चेन्नई संघ कोलकाता संघाला समाधानकारक लक्ष्य देऊ शकला. (Chennai Super Kings was 84 for 5 from 17 overs then posted 131 for 5 from 20 overs)
That's a FIFTY from @msdhoni 👏👏
Live – https://t.co/b4FjhJcJtX #CSKvKKR #TATAIPL pic.twitter.com/hIilac4AKo
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2022
धोनीचे शानदार अर्धशतक आणि विक्रमांची बरसात…
मागील अनेक वर्ष आयपीएल खेळणारा धोनी मैदानावर उतरल्यानंतर रेकॉर्ड करणार नाही, असं सहसा होत नाही. आयपीएल २०२२च्या पहिल्या सामन्यात देखील धोनीने मैदानावर येत आपल्या शानदार खेळीसह अनेक विक्रमांना गवसणी घातली. यात प्रामुख्याने चेन्नई संघाकडून खेळताना सर्वाधिक चौकार लगावणार धोनी प्रथम क्रमांकाचा खेळाडू बनला आहे. तर सर्वात आयपीएलमध्ये अर्धशतक साकारणार वयस्कर भारतीय खेळाडू म्हणूनही धोनी आता पहिल्या क्रमांकावर आहे.
MS Dhoni has scored a fifty in IPL after 28 innings.
The last time before today he scored a fifty in IPL was against RCB at Bangalore in 2019.#CSKvKKR
— Umang Pabari (@UPStatsman) March 26, 2022
महत्वाचं म्हणजे महेंद्रसिंग धोनीने त्याचे हे अर्धशतक आयपीएलमध्ये तब्बल २८ इनिंगनंतर साकारले आहे. अखेरीस त्याने वर्ष २०१९मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेँगलोर (आरसीबी) विरुद्ध अर्धशतक केले होते.
अधिक वाचा –
अखेर मेहनत फळाला आली! तब्बल इतक्या सामन्यांच्या प्रतीक्षेनंतर जड्डू बनला कॅप्टन
आता कोहलीतील फलंदाज पुन्हा जागा होणार, यंदा तो १००० धावा करणार; माजी कर्णधाराचे भाकीत