चेन्नई सुपर किंग्स संघाचा दमदार अष्टपैलू मोईन अली याने आयपीएल २०२२च्या ६८व्या सामन्यात फलंदाजीतून आग ओकली. त्याने राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळताना तुफान फटकेबाजी करत अवघ्या १९ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. त्याची फटकेबाजी पाहून असे वाटत होते की, तो शतकही लवकरच पूर्ण करेल. मात्र, तो त्यात अपयशी ठरला. त्याला ९३ धावांवरच समाधान मानावे लागले. यामुळे तो नर्व्हस नाइंटिजवर बाद होणारा चेन्नई संघाचा आठवा खेळाडू ठरला. (CSK Players Getting out on 90s)
शुक्रवारी (दि. २० मे) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी यावेळी मोईन अली (Moeen Ali) याच्या अर्धशतकाच्या जोरावर ६ विकेट्स गमावत १५० धावा केल्या. एका बाजूने चेन्नईचा डाव सांभाळणारा आणि शतकाच्या प्रतीक्षेत असणारा अली या सामन्यात ५७ चेंडूंचा सामना करताना ९३ धावाच करू शकला. त्याला या धावा करताना ३ षटकार आणि १३ चौकारांचीही साथ मिळाली.
चेन्नई संघाचे नर्व्हस नाइंटिजवर बाद होणारे खेळाडू
मोईन अलीव्यतिरिक्त नर्व्हस नाइंटिजवर बाद होणाऱ्या खेळाडूंमध्ये ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना, ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, शेन वॉटसन, मायकल हसी, मुरली विजय, मॅथ्यू हेडन, यांसारख्या खेळाडूंचाही समावेश आहे. शतकाच्या दिशेने वेगाने पाऊल टाकणारा ऋतुराज आयपीएल २०२२मध्येच ९९ धावांवर तंबूत परतला होता. त्याच्यानंतर रैना ९८ धावांवर बाद झाला. याव्यतिरिक्त फाफ डू प्लेलिस आणि शेन वॉटसन यांना प्रत्येकी ९६ धावाच करता आल्या होत्या. तसेच, मायकल हसी आणि मुरली विजय हेदेखील प्रत्येकी ९५ धावांवर बाद झाले होते. मॅथ्यू हेडनलाही शतक पूर्ण करण्यास ७ धावा कमी पडल्या होत्या. तो ९३ धावांवर तंबूत परतला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चेन्नई सुपर किंग्स संघाचे नर्व्हस नाइंटिजचा शिकार होणारे फलंदाज
९९ धावा- ऋतुराज गायकवाड
९८ धावा- सुरेश रैना
९६ धावा- फाफ डू प्लेसिस
९६ धावा- शेन वॉटसन
९५ धावा- मायकल हसी
९५ धावा- मुरली विजय
९३ धावा- मॅथ्यू हेडन
९३ धावा- मोईन अली*
आयपीएल इतिहासातील पहिला वाद म्हणजेच ‘स्लॅप-गेट’