---Advertisement---

प्रशिक्षक बनताच गंभीरने काढला धोनीवरचा राग? टीम इंडियातून सीएसकेचे चौघे ‘क्लिन बोल्ड’, सोशल मीडियावर चर्चा

On: शनिवार, जुलै 20, 2024 4:33 PM
Gautam Gambhir, MS DHoni
---Advertisement---

Head Coach Gautam Gambhir :- भारतीय पुरुष क्रिकेट संघ या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. ज्यामध्ये भारतीय संघाला 3 टी20 तर 3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. ज्याची सुरुवात 27 जुलै पासून होणार आहे. तर या दाैऱ्यासाठी बीसीसीआयने गुरुवारी (18 जुलै) भारतीय संघाची घोषणा केली. मात्र, दोन्ही संघातून चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणाऱ्या खेळाडूंना डावलण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे.

नवा भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व निवड समिती यांनी या दोन्ही संघांची घोषणा केली.‌ यामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली. कोलकाता नाईट रायडर्ससाठी‌ कर्णधार म्हणून खेळणाऱ्या श्रेयस अय्यर याचे भारतीय संघात पुनरागमन झाले. तर, कोलकात्याचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला प्रथमच भारतीय संघात जागा मिळाली. तर यापूर्वी कोलकत्ता संघाचा भाग राहिलेल्या सूर्यकुमार यादव याला कर्णधार व शुबमन गिल याला उपकर्णधार बनवले गेले.

असे असतानाच, झिम्बाब्वे दौऱ्यावर उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतरही चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा संघात आपली जागा बनवू शकला नाही. त्याची निवड न झाल्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गौतम गंभीर याच्यावर टीका करण्यात येत आहे. यासोबतच अनुभवी रवींद्र जडेजा याला देखील वनडे संघातून बाहेर करण्यात आले. तो सीएसकेचा उपकर्णधार आहे.

यासोबतच झिम्बाब्वे दौऱ्यावर पदार्पण करणारा युवा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे हा देखील संघात पुन्हा एकदा जागा मिळवण्यात अपयशी ठरला. मागील बऱ्याच काळापासून संघाबाहेर असलेला शार्दुल ठाकूर व दीपक चहर यांच्या नावाची चर्चा देखील न झाल्याचे सांगण्यात येत आहे. गौतम गंभीरने जाणीवपूर्वक एमएस धोनी याच्या जवळच्या खेळाडूंना डावलले असल्याचा आरोप सोशल मीडियामधून होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

गौतम गंभीरची इच्छा पूर्ण! टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये दाखल होणार केकेआरमधील साथीदार
‘आलीशान कार आणि घर, वर्षाला करोडो रुपयांची कमाई’, नव्या कर्णधाराची एकूण संपत्ती जाणून व्हालं थक्क!
‘हिम्मत असेल तर…’,मोहम्मद शमीने सानिया मिर्झासोबत लग्नाबाबतच्या अफलवांवर तोडले मौन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---